Join us
Daily Top 2Weekly Top 5

कराराचा भंग; पुन्हा आंदोलनाचा इशारा मनपा संघर्ष समितीचे निवेदन

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

अकोला: आंदोलन स्थगित केल्यानंतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मनपा कर्मचारी संघर्ष समितीने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. शनिवारी संघर्ष समितीच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

थकीत वेतनासह पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम, वेतन, सेवानिवृत्त वेतन नियमित करणे, उपदानाची रक्कम, अनुकंपा नियुक्तीच्या मुद्यावर मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या शिष्टाईने २८ जानेवारी रोजी संप मिटला. तीन महिन्यांचे थकीत वेतन अदा केल्यानंतर उर्वरित मागण्यांवर प्रशासनाने आजपर्यंतही कारवाई केली नसल्याने कराराचा भंग झाल्याचा आरोप करीत संघर्ष समितीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.