Join us

स्वित्झर्लंडहून सोने निर्यातीद्वारे काळ््या पैशांचे व्यवहार

By admin | Updated: December 15, 2014 03:26 IST

सराफी व्यवसायातून काळा पैसा व्यवहारात आणण्याला कसा अटकाव करता येईल याची काळजी सरकार करीत असताना स्वित्झर्लंडहून भारतात सोन्याची निर्यात वाढली आहे.

नवी दिल्ली/बर्न : सराफी व्यवसायातून काळा पैसा व्यवहारात आणण्याला कसा अटकाव करता येईल याची काळजी सरकार करीत असताना स्वित्झर्लंडहून भारतात सोन्याची निर्यात वाढली आहे. ही निर्यात २०१४ मध्ये तब्बल १ हजार अब्ज रुपयांपर्यंत गेली आहे.स्वीस कस्टम्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडने भारतात २.८ अब्ज स्वीस फ्रँक्सपेक्षा जास्त सोन्याची (१८ हजार कोटी रुपये) निर्यात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात २.२ अब्ज स्वीस फ्रँक्सने जास्त आहे.सोन्याच्या निर्यातीत वेगाने वाढ झाल्यामुळे स्वीत्झर्लंडसाठी भारत हा सर्वात मोठे निर्यात स्थळ बनले आहे. काळ््या पैशांचे व्यवहार (मनी लाँड्रींग) करण्यासाठी या निर्यातीचा वापर होऊ शकतो. अर्थात या विषयावर ना स्वीत्झर्लंडने ना भारताने काहीही भाष्य केलेले नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)