Join us

भिवंडीच्या मुस्लिमबहुल गावात भाजपाची शाखा

By admin | Updated: August 21, 2014 19:33 IST

वज्रेश्वरी : लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आणि आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या आणि राष्ट्रवादीचे विद्यमान ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेल्या मुस्लिमबहुल अशा महापोली गावामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा स्थापन केली आहे. या वेळी शाखाध्यक्ष म्हणून सैफ पहेल व नमीर पहेल आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. या वेळी खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शाखा स्थापन करून शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी पालघरचे खासदार चिंतामण वनगा, आमदार विष्णू सवरा, शांताराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(वार्ताहर / दीपक देशमुख)