Join us

मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांचा जन्मदिन सोहळा

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

- २३ जुलै रोजी आयोजन : दिगंबर जैन मंदिर, सदर

- २३ जुलै रोजी आयोजन : दिगंबर जैन मंदिर, सदर
नागपूर : पूज्य आचार्य पुष्पदंतसागर गुरुदेव यांचे प्रिय शिष्य आचार्य प्रसन्नसागर महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी दिगंबर जैन मंदिर, सदर येथे करण्यात आले आहे. आचार्य प्रसन्नसागर महाराज व आचार्य पीयूषसागर महाराज सध्या रामटेक येथे दिगंबरत्वाची कठोर साधना करीत आहेत. वस्त्रविरहित राहणे आणि केशलोचन करणे ही कडक साधना ते करीत आहेत. याप्रसंगी महाराजांच्या उपदेशाचाही लाभ हजारो भाविक रामटेक येथे घेत आहेत. आचार्य प्रसन्नसागर महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सदर येथील दिगंबर जैन मंदिरात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ३० जुलै रोजी हेडगेवार भवन, रेशीमबाग येथे कलश स्थापना करण्यात येणार आहे. ३१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन खंडेलवाल मंदिर ट्रस्ट, सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्व जैन बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.