Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये मक्याची सरकारी खरेदी सुरू

By admin | Updated: July 14, 2014 01:18 IST

भारतीय अन्न महामंडळाला बिहारमध्ये किमान आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी दिले आहेत

नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाला बिहारमध्ये किमान आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी दिले आहेत. यामुळे भाव पाडून विक्री करावी लागत असलेल्या बिहारमधील शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळणार आहे.सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत महामंडळाकडून आधारभूत किमतीत मका खरेदी केला जात आहे. यंदा मक्यासाठी १,३१० रुपये प्रतिक्विंटल एवढी आधारभूत किंमत जाहीर झाली आहे; मात्र बिहारमध्ये केवळ प्रति क्विंटल ९०० रुपये एवढाच भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी भावात मका खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये १६ केंद्रांवर मका खरेदी केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपासून वंचित ठेवले जात आहे. अशा स्थितीत राज्य सरकारनेही स्वत:हून मका खरेदी करायला हवा होता, अशी अपेक्षा पासवान यांनी व्यक्त केली.यंदा मक्यासाठी १,३१० रुपये प्रति क्विंटल एवढी आधारभूत किंमत जाहीर झाली आहे. साधारणत: गहू आणि तांदूळ यांची भारतीय अन्न महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते; मात्र चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत महामंडळाने पाच राज्यांतून सुमारे १२.१५ लाख टन एवढ्या मक्याची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी महामंडळाने मक्याची एकूण २,२४३ टन एवढी खरेदी केली होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)