Join us  

कंपन्यांची मनमानी : पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:04 AM

कंपन्यांची मनमानी : रोज दर ठरविणे पुन्हा सुरू

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये दररोज होणारा बदल सुमारे तीन महिन्याच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाला असून, सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लिटरमागे ६० पैशांनी वाढ केली आहे. सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्यांनी रविवारपासून दररोज इंधनाच्या दरामध्ये बदल करण्यास प्रारंभ केला आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लिटरमागे प्रत्येकी ६० पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर सलग दुसºया दिवशी (सोमवारी) पुन्हा या दोन्ही दरांमध्ये पुन्हा ६० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सरकारी तेल कंपन्या असलेल्या इंडियन आॅइल कॉर्पाेरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पाेरेशन आणि हिंदुस्तान आॅइल कॉर्पाेरेशन यांनी गेले ८२ दिवस इंधनाच्या दरांचा दररोज घेतला जाणारा आढावा बंद ठेवला होता. मात्र रविवारपासून अचानक या कंपन्यांची हा आढावा पुन्हा सुरू करून दरवाढ जाहीर केली आहे. सरकारने १४ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये वाढ केली, मात्र तेल कंपन्यांनी ही वाढ ग्राहकांवर न टाकता स्वत: सोसत असल्याचे जाहीर केले.त्यानंतर आंतरराष्टÑीय बाजारामध्ये खनिजतेलाच्या किमती दोन दशकामधील नीचांकी आल्या तरी या कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना न देता किमती कायम ठेवल्या होत्या. या काळामध्ये आंतरराष्टÑीय बाजारामध्ये कमी झालेल्या दरांचा लाभ ग्राहकांना न मिळता कंपन्यांनी आपला नफा वाढविण्याला प्राधान्य दिलेले दिसले.८५ टक्के खनिजतेलाची होते आयातभारत आपल्या गरजेपैकी ८५ टक्के खनिजतेलाची आयात करीत असतो. १६ जून, २०१७ पासून दररोजच्या आंतरराष्टÑीय बाजारपेठेतील दरांप्रमाणे देशातील इंधनाचे दर ठरविले जात होते. मात्र आंतरराष्टÑीय बाजारातील दरांमधील अस्थिरता बघून भारतामधील दर गोठविण्यात आले होते, अशी माहिती एका अधिकाºयाने दिली.

टॅग्स :पेट्रोलडिझेल