Join us  

बजाज ऑटोचा मोठा निर्णय! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 5:21 PM

Bajaj Auto : मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे.

नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी (India Fight Against COVID-19) सरकारसह अनेक कंपन्या देखील मदत करत आहेत.  या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑटो लिमिटेडने (Bajaj Auto) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.  ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षासाठी कंपनीकडून पगार दिला जाईल. याशिवाय, या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे. (bajaj auto says employees who die of covid 19 will pay salary to family for 2 years)

वैद्यकीय विम्याचा कालावधी 5 वर्षांसाठी वाढविण्यात येणारपुणेस्थित कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दिलेला वैद्यकीय विमा देखील पाच वर्षांसाठी वाढविण्यात येईल. बजाज ऑटोने देऊ केलेल्या इतर जीवन विम्याच्या फायद्यांपेक्षा हे फायदे जास्त आहेत.

शिक्षणासाठी देणार 5 लाखांची मदतएका लिंक्डइन पोस्टमध्ये बजाज ऑटोने असे म्हटले आहे की, 'सहाय्य धोरणाअंतर्गत 24 महिन्यांपर्यंत दरमहा मासिक वेतनाची भरपाई (2 लाख रुपयांपर्यंत), जास्तीत जास्त दोन मुलांसाठी बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रति मुल वर्षाकाठी 1 लाख रुपयांची मदत  आणि पदवीसाठी प्रत्येक वर्षासाठी 5 लाख रुपये शैक्षणिक मदत दिली जाईल.'

गेल्या वर्षी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना देखील मदतबजाज ऑटोने असेही म्हटले आहे की, हा मदत निधी 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत या दरम्यान सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. अर्थात ज्यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे. बजाज ऑटोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना विविध उपाययोजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत राहू. ही मदत केवळ लसीकरण केंद्र यापुरती मर्यादित नाही तर कोविड केअर सर्व्हिस, अ‍ॅक्टिव्ह टेस्टिंग आणि हॉस्पिटलायझेशनसाठीही मदत केली जात आहे.

बोरोसिल कंपनी देखील 2 वर्ष पगार देणारबजाज ऑटोपूर्वी बोरोसिल अँड बोरोसिल रिन्यूवेबल्सने त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील करु असे जाहीर केले होते. 

टॅग्स :कोरोनाची लसबजाज ऑटोमोबाइलकोरोना वायरस बातम्याव्यवसाय