Join us  

ओलाचे भाविश अग्रवाल ठरले तीन Unicorn चे मालक बनणारे दुसरे भारतीय, माहितीये पहिलं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 3:40 PM

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची एआय स्टार्टअप कंपनी एक कंपनी अलीकडेच युनिकॉर्न बनली आहे.

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल  (Bhavish Aggarwal) यांची एआय स्टार्टअप कंपनी Krutrim AI अलीकडेच युनिकॉर्न बनली आहे. युनिकॉर्न बनताच, भाविश अग्रवाल हे ३ युनिकॉर्न स्टार्टअपचे मालक बनणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. यापूर्वी सुपम माहेश्वरी यांनी हे स्थान मिळवलं होतं आणि आता भाविशही या यादीत सामील झाले आहेत.ओला समूहाची (Ola Group) एआय कंपनी Krutrim नं अलीकडेच मॅट्रिक्स पार्टनर्सच्या नेतृत्वाखालील फंडिंग राऊंडमध्ये ५ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे ४१५ कोटी रुपये उभारले आहेत. ही रक्कम एक अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मूल्यांकनाच्या आधारे उभारण्यात आली. अशाप्रकारे क्रुत्रिम ही युनिकॉर्न बनणारी भारतातील पहिली एआय कंपनी ठरली आहे. एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्य असलेल्या स्टार्टअप कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं. मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया आणि इतर प्रमुख गुंतवणूकदारांनी ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.२२ भाषांत लाँच झालेलं कृत्रिमओलाचे सह-संस्थापक आणि सीईओ भावीश अग्रवाल यांनी १५ डिसेंबर रोजीच ही मूळ स्वदेशी ChatGPT लाँच केलं होतं. हे एक मल्टी लँग्वेज मॉडेल आहे, जे २२ भारतीय भाषांमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. या AI च्या माध्यमातून भाविश अग्रवाल एआयच्या जागतिक स्पर्धेशी स्पर्धा करत आहेत. भावीश अग्रवाल यांनी भारताच्या एआयला कृत्रिम असं नाव दिलंय, कारण याचा थेट संबंध भारतीय संस्कृतीशी आहे. याला कृत्रिम बुद्धीमत्ता असंही म्हटलं जातं. संस्कृतमध्येही आर्टिफिशियलला कृत्रिम म्हटलं जातं. हे नाव भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे.सुपम माहेश्वरी कोणत्या युनिकॉर्नचे मालक?भाविश अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, सुपम माहेश्वरी एकमेव भारतीय आहेत जे ३ युनिकॉर्नचे मालक आहेत. ते मुलांचा रिटेल ब्रँड FirstCry, लॉजिस्टिक फर्म XpressBees आणि ई-कॉमर्स रोल-अप प्लॅटफॉर्म GlobalBees चे सह-संस्थापक आहेत.

टॅग्स :ओलाव्यवसाय