Join us

भवरलालजी जैन यांच्यावर मुंबईत उपचार; प्रकृतीत सुधारणा

By admin | Updated: January 29, 2016 00:30 IST

जळगाव दि. २८- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांना दि. २७ रोजी सकाळी व्हर्टीगोचा त्रास झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ होऊ लागले.

जळगाव दि. २८- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांना दि. २७ रोजी सकाळी व्हर्टीगोचा त्रास झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ होऊ लागले. सुदैवाने तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या प्रकृतीत ताबडतोब सुधारणा साधणे शक्य झाले. दि.२८ रोजी एअर एम्ब्युलन्सद्वारे त्यांना पुढील इलाजासाठी मुंबई येथे जसलोक हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. निष्णात हृदयरोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुसील मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून चिंतेचे कारण नसल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा त्यांचे ज्येष्ठ पुत्र अशोक जैन यांनी सांगितले.