भवरलाल जैन यांना मुंबईत हलविले
By admin | Updated: February 15, 2016 00:37 IST
(सेंट्रल डेस्क व मुख्य १साठी)
भवरलाल जैन यांना मुंबईत हलविले
(सेंट्रल डेस्क व मुख्य १साठी)जळगाव- जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे १४ रोजी दुपारी २.४५ वाजता विशेष विमानाने मुंबई येथे वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले.काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना विशेष विमानाने जळगाव येथे आणण्यात आले होते. मात्र १४ रोजी दुपारी पुन्हा प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना विशेष विमानाने मुंबई येथे हलविण्यात आले. डॉ.कात्रक, डॉ.मुन्शी, डॉ.सुभाष चौधरी व कुटुंबातील सदस्य त्यांच्यासोबत असल्याची माहिती जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.