टेकॉप्स पार्कला उत्तम प्रतिसादनागपूर : टीआयपीएलच्या उमरेड रोडवरील प्रीमियम ले-आऊटमध्ये आधुनिक सुविधांसह खेळाचे मैदान, बगिचा, मंदिर तयार आहे. टेकॉप्स पार्क असे या प्रकल्पाचे नाव असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अन्य सुविधांमध्ये २४ महिन्यांची सुलभ हप्तेवारी, आकर्षक प्रवेशद्वार, क्लब हाऊस आणि अंतर्गत रस्त्यांवर लाईट बसविले आहेत. टेकॉप्स पार्कचे बुकिंग सुरू आहे. आकारचा स्पर्धा परीक्षा महोत्सवनागपूर : स्पर्धा परीक्षा या आव्हानात्मक क्षेत्रात वाढती स्पर्धा, बदलत्या जगासोबत बदललेला अभ्यासक्रम आणि उपलब्ध असलेल्या संदर्भ साहित्यातून यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी परीक्षेच्या पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांची तयारी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आकार फाऊंडेशनने यूपीएससी व एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण तयारीसाठी योग्य गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यंत्रणा उपलब्ध करून देणे, २४ तास अभ्यासिका तयार करून अभ्यासाची संस्कृती विकसित करणे, दरवर्षी २०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन संपूर्णपणे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देणे इत्यादी कार्य यशस्वीरीत्या सुरू केले आहे. आकारचे २०१० पासून आजपर्यंत ४६७ विद्यार्थ्यांची प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदावर निवड झाली आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या सत्रात सुनील आगवणे मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धा परीक्षेत सामान्य अध्ययन जीएसची तयारी व इंटरनेटचा यशस्वी वापर, यावर मार्गदर्शन करून वर्कशीट सोडवून घेणार आहेत. महोत्सव दोन महिने प्रत्येक रविवार व सुटीच्या दिवशी एकूण १५ दिवस प्रत्येक दिवशी ९ तासांचा असेल. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रविवारला राज्यसेवा आणि एसटीआय पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज राहील. महोत्सवाचे आयोजन २० आणि २१ डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत छोटा ताजबाग, सक्करदरा येथे केले आहे.
टेकॉप्स पार्कला उत्तम प्रतिसाद
By admin | Updated: December 20, 2014 08:40 IST