Join us

जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात नगर राज्यात अव्वल

By admin | Updated: January 5, 2016 00:16 IST

सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी विमा योजनेत नगर जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ज्ञानेश दुधाडे,  अहमदनगरसर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी विमा योजनेत नगर जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील ४० हजार ६९३ रु ग्णांना दोन वर्षात १३६ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठीआहे. सरकारने २ जून २०१२ ला राज्यातील आठ जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना सुरू केली होती. ही आरोग्य योजना नगर जिल्ह्यात दुसऱ्या वर्षी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१३ ला लागू झाली. या योजनेत पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशन कार्ड, अंत्योदय आणि अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळत आहे. नगर जिल्ह्यात ही आरोग्य विमा योजना सुरू झाल्यापासून दोन वर्षांत ४० हजार ६९३ रुग्णांना १३६ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. रुग्णांना लाभ मिळवून देण्यात नगर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक ४७ हजार ३१४ लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून लाभाची रक्कम ११९ कोटी रुपये आहे.राज्यात ६ लाख लोकांना या योजनेत लाभ देण्यात आला असून त्याची रक्कम हजार कोटींत पोहोचली आहे. या योजनेत राज्यात सर्वांत कमी लाभ नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या १७३ लोकांना देण्यात आला असून लाभाची रक्कम १५ लाख ५० हजार रुपयेआहे.