Join us

एएससीआयच्या अध्यक्षपदी बिनॉय रायचौधरी

By admin | Updated: September 11, 2015 02:44 IST

अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदी एचटी मीडिया लिमिटेडचे संचालक बिनॉय रायचौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा गुरुवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण

मुंबई : अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदी एचटी मीडिया लिमिटेडचे संचालक बिनॉय रायचौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा गुरुवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषदेत करण्यात आली. रायचौधरी यांचा कार्यकाळ २०१५-१६ असा एक वर्षाकरिता असेल. जाहिरातींबाबत ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल आॅफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी आर.के. स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्रीनिवासन. के. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मीडिया ब्रँड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर सिन्हा यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. अन्य सदस्यांमध्ये अबांती शंकरनारायणन (उपाध्यक्ष, सीआयएबीसी), एल राजवानी (व्यवस्थापकीय संचालक, प्रॉक्टर अ‍ॅण्ड गँबल हायजिन अ‍ॅण्ड हेल्थकेअर), अर्णवदास शर्मा (अध्यक्ष, बेनेट अ‍ॅण्ड कोलमन कं. लि.), डी. शिवकुमार (अध्यक्ष, पेप्सीको इंडिया), आय. व्यंकट (संचालक, इनाडू), नरेंद्र अंबवानी (संचालक, अ‍ॅग्रोटेक फूड लि.), परितोष जोशी (संचालक, प्रोव्हाकॅट्युअर), प्रेमा सागर (उपाध्यक्ष, बर्सन मार्सटेलर), राजन आनंदन (व्यवस्थापकीय संचालक, गुगल इंडिया प्रा. लि.), समीर सिंह (कार्यकारी संचालक, हिंदुस्थान युनिलिव्हर लि.) , एस.के. पालेकर (व्यवस्थापकीय शिक्षणतज्ज्ञ, एस. पी. जैन इन्स्टिट्यूट), सुभाष कामत (बीबीएच इंडिया प्रा. लि.), सुनील लुल्ला (अध्यक्ष, ग्रे ग्रुप) यांचा समावेश आहे. अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल आॅफ इंडियाकडे २०१४-१५ या वर्षात देशभरातून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत एकूण १ हजार ८७७ प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी १ हजार ३८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, असे काऊन्सिलतर्फे नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)