Join us

तेलाच्या घसरणीचा जगाच्या अर्थव्यवस्थेला लाभ

By admin | Updated: January 21, 2015 00:03 IST

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहक देशांना १,५00 अब्ज डॉलरची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होणार आहे.

दावोस : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहक देशांना १,५00 अब्ज डॉलरची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होणार आहे. जगाची अर्थव्यवस्था वाढण्यास याचा उपयोग होईल. या स्थितीचा सर्वाधिक लाभ मिळून अमेरिका पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी जाणार आहे. भारताकडूनही जगाला अपेक्षा आहेत. ‘जागतिक आर्थिक मंच’ची वार्षिक बैठक आज येथे सुरू झाली. या बैठकीच्या व्यासपीठावरून जागतिक विश्लेषण आणि माहिती सेवा क्षेत्रातील प्रमुख संस्था आयएचएसने एक अहवाल जाहीर केला. त्यात वरील माहिती देण्यात आली आहे. आयएचएसचे मुख्य अर्थतज्ज्ञ नरिमन बेहरावेश यांनी सांगितले की, सध्या जगात दिसणारा आर्थिक कल १८0 आणि १९९0 च्या दशकातील स्थितीशी मिळताजुळता आहे. अमेरिका पुन्हा एकदा जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन बनली आहे. डॉलर मजबूत होत आहे. अमेरिकेचे तेल उत्पादन जगातील सर्वांत जास्त होण्याच्या टप्प्यावर आहे. दावोस परिषदेत महिलांची संख्या अवघी १७ आहे. तथापि, परिषदेत महिलांचा चांगला प्रभाव दिसून आला. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी तरुण प्रतिनिधींमध्ये अग्रणी आहेत. भारतीय प्रतिनिधींच्या यादीत ईशा यांची आई नीता अंबानी यांचेही नाव आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर, एसबीआयच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ४वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दावोसच्या परिषदेसाठी स्वीत्झर्लंड सरकारने चोख बंदोबस्त ठेवला आहे. ५ हजारपेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दावोसची लोकसंख्या केवळ १0 हजार आहे, तर परिषदेला आलेल्या प्रतिनिधींची संख्या २,५00 आहे.