Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम, रिटेल क्षेत्रातील नोकऱ्यांचा सरकारला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:55 IST

बांधकाम, किरकोळ विक्री (रिटेल) आणि वाहतूक या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत असून, ही क्षेत्रे रोजगाराच्या आघाडीवर सरकारला आधार देणारी ठरत आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : बांधकाम, किरकोळ विक्री (रिटेल) आणि वाहतूक या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत असून, ही क्षेत्रे रोजगाराच्या आघाडीवर सरकारला आधार देणारी ठरत आहेत. या क्षेत्रात कौशल्य विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, २0१७ ते २0२२ या काळात कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ३४ क्षेत्रांतील १,२६८ लाख लोकांना प्रशिक्षित केले जाईल. त्यातून रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. रिटेल, वाहतूक आणि बांधकाम या क्षेत्रात रोजगार निर्मितीची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल.कौशल्य विकास मंत्रालयाच्या अधिकाºयांनी सांगितले की, रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालय ६२.२ लाख लोकांना प्रशिक्षित करणार आहे. बांधकाम क्षेत्रात ३२0 लाख तर रिटेल क्षेत्रात १0७ लाख लोकांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. वस्त्रोद्योग, हस्तकला व अन्य एका क्षेत्रात ६0 लाखांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे.सूत्रांनी सांगितले की, पाच वर्षांत किती लोकांना नोकºया दिल्या या प्रश्नाचे उत्तर देताना सरकारची अडचण होऊ नये यासाठी ३४ क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही अनियोजित क्षेत्रे असल्यामुळे या क्षेत्रात नोकºया लवकर लागतात तशा लवकर जातात.>२.८० कोटी लोकांचा लाभकौशल्य विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २0११-१४ या काळात १.७३ कोटी लोकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले गेले, तर २0१५ ते २0१८ या काळात २.८0 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले.