Join us

बडोदा बँकेच्या अधिकाऱ्यांना कोठडी

By admin | Updated: October 14, 2015 23:09 IST

विशेष सीबीआय न्यायालयाने बँक आॅफ बडोदाचे सहायक महाव्यवस्थापक एस.के. गर्ग आणि बँकेच्या विदेशी चलन विभागाचा प्रमुख जैनिश दुबे या दोघांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे.

नवी दिल्ली : विशेष सीबीआय न्यायालयाने बँक आॅफ बडोदाचे सहायक महाव्यवस्थापक एस.के. गर्ग आणि बँकेच्या विदेशी चलन विभागाचा प्रमुख जैनिश दुबे या दोघांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे. ६००० कोटी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली होती.सीबीआयने बुधवारी गर्ग आणि दुबे या दोघांना विशेष सीबीआय न्यायाधीश पी.के. जैन यांच्या न्यायालयात हजर केले. त्यांना पाच दिवसांची कोठडी मंजूर करण्याची मागणी सीबीआयने यावेळी केली. पण न्यायालयाने केवळ दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. दरम्यान बँक आॅफ बडोदाचे नवनियुक्त चेअरमन रवी वेंकटेशन यांनी नवी दिल्ली येथे वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असे वेंकटेशन यांनी म्हटले आहे. दोघांतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)