Join us  

मे महिन्यामध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; RBI नं सुट्ट्यांची यादी केली जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 6:48 AM

Bank Holiday - बँकांना शनिवार, रविवारसह इतर सणांच्या दिवशी सुट्टी दिली जाते, त्यात कोणत्या भागात कधी बँक बंद आहेत हे जाणून घ्या

नवी दिल्ली : मे महिन्यात देशातील बँकांना एकूण १२ दिवस सुट्या राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या देशाच्या सर्वच भागात राहणार नाहीत. राज्यानुसार, त्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँक, तसेच राज्य सरकारांनी मे २०२४ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे.

चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्यांसह एकूण १२ सुट्या त्यात आहेत. काही राज्यांत लोकसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली सुटी, रवींद्रनाथ टागोर जयंती, बसव जयंती, बुद्ध जयंती, नजरुल जयंती आणि अक्षय तृतीया, आदी सुट्यांचा त्यात समावेश आहे.

बँका कधी, कुठे राहणार बंद?

१ मे      महाराष्ट्र दिन, कामगार दिन     (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच             इम्फाळ, कोची, कोलकता, पणजी,             पाटणा आणि तिरुवनंतपूरम) ५ मे      रविवार     (सर्व ठिकाणी) ८ मे      रविंद्रनाथ जयंती     (कोलकता)१० मे      बसव जयंती, अक्षय तृतीया     (बंगळुरू)११ मे      दुसरा शनिवार     (सर्व ठिकाणी) १२ मे      रविवार    (सर्व ठिकाणी) १६ मे      राज्य दिन    (गंगटोक) १९ मे      रविवार    (सर्व ठिकाणी) २० मे      लोकसभा निवडणूक    (बेलापूर, मुंबई) २३ मे      बुद्ध पौर्णिमा    (बहुतांश ठिकाणी)२५ मे      नजरुल जयंती    (काही ठिकाणी) २६ मे      रविवार    (सर्व ठिकाणी)

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक