Join us  

ऑगस्टमध्ये तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद, अशी आहे सुट्ट्यांची यादी, आताच करा नियोजन नाहीतर होईल खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:14 PM

bank holidays august 2021: ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवार तसेच इतर सुट्ट्या मिळून देशातील विविध भागांत १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.

मुंबई - विविध सणांमुळे ऑगस्ट महिन्यात सार्वजनिक सुट्ट्यांची रेलचेल दिसून येणार आहे. मोठ्या प्रमाणात येत असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होणार आहे. (bank holidays august 2021) शनिवार, रविवारी येणाऱ्या आठवड्याच्या सुट्ट्या आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांमुळे ऑगस्टमधील अर्धा महिना बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवार तसेच इतर सुट्ट्या मिळून देशातील विविध भागांत १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. (Banks will be closed for 15 days in August, this is the list of holidays)

ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही रविवारने होत आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारच्या आठवड्याच्या सुट्ट्या मिळून एकूण सात सुट्ट्या असतील. १ ऑगस्टनंतर ८, १५,२२ आणि २९ ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी येत आहे. तसेच १४ आणि २८ ऑगस्ट या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असलीत. तसेच इतर काही सणांच्या सुट्ट्याही बँकांना मिळणार आहे. या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे.ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी १) १ ऑगस्ट - रविवार२) ८ ऑगस्ट - रविवार३) १३ ऑगस्ट -पॅट्रिएट डे (इंफाळमध्ये बँका बंद)४) १४ ऑगस्ट - दुसरा शनिार ५) १५ ऑगस्ट - रविवार ६) १६ ऑगस्ट - पारशी नववर्ष ७) १९ ऑगस्ट - मोहरम८) २० ऑगस्ट - फर्स्ट ओणम९) २१ ऑगस्ट- थिरुवोणम - (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)१०) २२ ऑगस्ट - रविवार११) २३ ऑगस्ट श्री नारायण गुरू जयंत (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)१२) २८ ऑगस्ट - चौथा शनिवार १३) २९ ऑगस्ट - रविवार १४) ३० ऑगस्ट जन्माष्टमी १५) ३१ ऑगस्ट - गोपाळ काला

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रव्यवसाय