Join us  

‘इंडिया बुल्स’मध्ये बँकांचे अडकले २७,५00 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 2:08 AM

स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) सर्वाधिक ८,१00 कोटी इंडिया बुल्समध्ये अडकले आहेत.

नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या ‘इंडिया बुल्स समूहा’त विविध सरकारी व खासगी बँकांचे तब्बल २७,५८0 कोटी रुपये अडकले आहेत. कर्ज आणि ‘अपरिवर्तनीय डिबेंचर्स’ या स्वरूपातील हा पैसा आहे. इंडिया बुल्स समूहाच्या प्रवर्तकांवर आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात एक याचिकाही दाखल झाली आहे.स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) सर्वाधिक ८,१00 कोटी इंडिया बुल्समध्ये अडकले आहेत. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स (आयएचएफएल), तसेच कंपनीची १00 टक्के उपकंपनी इंडिया बुल्स कमर्शियल क्रेडिट (आयसीसीएल) व समूहातील कंपनी इंडिया बुल्स कंझ्युमर फायनान्स (आयसीएफएल) या कंपन्यांत एसबीआयचा पैसा अडकला आहे. त्याखालोखाल बँक आॅफ बडोदाचे (देना बँक व विजया बँक यांच्यासह) ६,४६0 कोटी व येस बँकेचे ६,0४0 कोटी अडकले आहेत, असे मॅक्वायरी रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.येस बँकेच्या नेटवर्थच्या (वित्त वर्ष २0२0 च्या पहिल्या तिमाहीनुसार २७,000 कोटी) एक पंचमांश रक्कम इंडिया बुल्समध्ये अडकली आहे. त्यामुळे हप्ते थकल्यानंतर येस बँकेला सर्वाधिक जोखीम पत्करावी लागणार आहे. जोखमीच्या बाबतीत बँकआॅफ बडोदा दुसऱ्या स्थानी आहे. या बँकेची आपल्या नेटवर्थच्या १0 टक्क्यांएवढी रक्कम इंडिया बुल्समध्ये अडकली आहे. इंडसइंड बँकेचे ३,0८0 कोटी, तर एचडीएफसी बँकेचे १,६५0 कोटी रुपये इंडिया बुल्समध्ये अडकले आहेत. इंडिया बुल्समध्ये पैसे अडकलेल्या इतर बँका व वित्तीय संस्थांत आरबीएल बँक (३९0 कोटी रुपये), अ‍ॅक्सिस बँक (१,६९0 कोटी रुपये) आणि कोटक महिंद्रा बँक (एकूण १७0 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :व्यवसाय