Join us

बँका बंद, एटीएम फुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:17 IST

ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पैशांचा जास्तीचा भरणा करण्यात आल्याचे बँकाकडून सांगण्यात आले.

कुलदीप घायवट  मुंबई : सलगच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका बंद आहेत. त्यामुळे एटीएमवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पैशांचा जास्तीचा भरणा करण्यात आल्याचे बँकाकडून सांगण्यात आले. मात्र, एटीएम कार्डची मर्यादा आणि बँकेने लावून दिलेला सेवाकर लक्षात ठेऊन एटीएम कार्डचा वापर करावा. एटीएम कार्डची पैसे काढण्याची मर्यादा जेवढी असेल, तेवढेच पैसे काढता येणार आहेत, अशी माहिती बँक तज्ज्ञांनी दिली.पोलिसांची संख्या वाढविली : मोठ्या विकेंडला मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच. सलग सुट्ट्यांमुळेही २९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान वाहतूककोंडीची समस्या उदभवू शकते. संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेऊन पोलिसांची संख्या वाढविली आहे. वाहतुकीच्या मार्गात कोणतेही बदल केले नसल्याचे, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘आॅनलाइन-नेटबँकिग’चा फायदाडेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग या सेवांचा फायदा या सलग सुट्ट्यांच्या दिवशी नागरिकांना होणार आहे. मॉल, दुकाने, हॉटेलमध्ये आॅनलाइन व्यवहारांमुळे नागरिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.