Join us

‘बँकांनी संशयास्पद प्रकरणे इडीकडे पाठवावीत’

By admin | Updated: February 12, 2015 23:39 IST

बँकांनी केवायसीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ग्राहकांच्या माहितीवर तसेच अँटी मनी लाँडरिंग नियमांबाबत लक्ष ठेवले पाहिजे.

मुंबई : बँकांनी केवायसीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ग्राहकांच्या माहितीवर तसेच अँटी मनी लाँडरिंग नियमांबाबत लक्ष ठेवले पाहिजे. संशयास्पद प्रकरणे अंमलबजावणी संचालनालयाकडे (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट - ईडी) पाठविली पाहिजेत, असे निर्देश रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने दिले आहेत. काही निर्यातदारांकडून वेळेत आॅर्डर पूर्ण होत नसल्याने अशी प्रकरणे अंमलबजावणी संचालनालयाकडे पाठविण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत. बँकेने याबाबत सोमवारी पत्रक जारी केले आहे; मात्र त्यात कोणत्याही बँकेचा उल्लेख केलेला नाही; मात्र वृत्तसंस्थेने आरबीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन कोलकाता येथील युको बँकेकडून सव्वातीन अब्ज डॉलरच्या गैरवापराच्या प्रकरणाशी याचा संबंध असल्याचा दावा केला आहे.