Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी वसूल केले ५ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:33 IST

सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँका आणि खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँकांनी मागील आर्थिक वर्षात २०१७-१८ मध्ये खात्यात किमान रक्कम न ठेवणाऱ्या खातेदारांकडून ५००० कोटी रुपयांची वसुली केली आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँका आणि खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँकांनी मागील आर्थिक वर्षात २०१७-१८ मध्ये खात्यात किमान रक्कम न ठेवणाऱ्या खातेदारांकडून ५००० कोटी रुपयांची वसुली केली आहे. बँकिंग आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.खातेदारांकडून दंड वसूल करण्यात भारतीय स्टेट बँक अग्रस्थानी आहे. या बँकेने २,४३३.८७ कोटी रुपये वसूल केले आहेत. २४ बँकांनी एकूण ४,९८९.५५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, एसबीआयला मागील आर्थिक वर्षात ६,५४७ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. जर बँकेला हे अतिरिक्त उत्पन्न मिळाले नसते, तर बँकेचा तोटा अधिक झाला असता.एचडीएफसी बँकेने खातेदारांकडून ५९०.८४ कोटी रुपये, एक्सिस बँकेने ५३०.१२ कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बँकेने ३१७.६० कोटी रुपये वसूल केले आहेत. एसबीआयने २०१२ पर्यंत खात्यात किमान रक्कम न ठेवल्याबद्दल दंड वसूल केला होता. त्यानंतर, ही व्यवस्था १ आॅक्टोबर २०१७ पासून पुन्हा सुरू केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना विविध शुल्क वसूल करण्याचा अधिकार आहे.>बँकांचे कर्ज १२.४४ टक्क्यांनी वाढलेबँकांचे कर्ज २० जुलैै रोजी संपलेल्या पंधरवाड्यात १२.४४ टक्क्यांनी वाढून ८६,१३,१६४ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. एक वर्षांपूर्वी याच काळात बँकांचे कर्ज ७६,५९,८९८ कोटी रुपये होते. ६ जुलै रोजी समाप्त पंधरवड्याच्या तुलनेत बँकांच्या कर्जाची वाढ किरकोळ होती.कर्ज १२.७८ टक्के वाढून ८६,६०,०६९ कोटी रुपये होते. याच काळात बँकांतील जमा रक्कम ८.१५ टक्क्यांनी वाढून १,१४,३८,१२१ कोटींवर पोहोचल्या. एका वर्षांपूर्वी या ठेवी १,०५,७५,६१५ कोटी रुपये होत्या.६ जुलै रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या ठेवी ८.३३ टक्क्यांनी वाढून १,१४,८५,७६८ कोटी रुपये होत्या. जूनमध्ये कृषी आणि त्यासंबंधीच्या कामासाठीचे कर्ज कमी होऊन ६.५ टक्के झाले. ते जून २०१७ मध्ये ७.५ टक्के होते.>जूनमध्ये वैयक्तिक कर्जात 19.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.>एक वर्षांपूर्वी याच काळात हा दर १४.१ टक्के होता. उद्योगांचे कर्ज ०.९ टक्के वाढले असून, मागील वर्षी याच काळात ते १.१ टक्के कमी झाले होते.

टॅग्स :बँक