नवी दिल्ली : गुरुवारपासून सलग चार दिवस बँकांना सुटी असल्याने बँकेमार्फत काही व्यवहार करायचे असतील तर बुधवारपर्यंत करून मोकळे व्हा. गुरुवारी होळी आहे, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि त्यानंतर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँकांना सुटी राहील, तसेच रविवारी साप्ताहिक सुटी आहे. तथापि, लोकांना अडचण येऊ नये म्हणून बँका एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवणार आहे, असे सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.२८ मार्च रोजी आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने संप पुकारला आहे. हा संप झाला तर आयडीबीआय बँक आणखी एक दिवस बंद राहू शकते. आॅल इंडिया बँक इम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) या संघटनेशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणास या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.आयडीबीआय बँकेत सरकारचा ८० टक्के हिस्सा आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना सरकार या बँकेतील आपला हिस्सा ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्या विरुद्ध कर्मचारी संघटनांनी २८ मार्च रोजी संप पुकारला आहे.
गुरुवारपासून बँका चार दिवस बंद !
By admin | Updated: March 22, 2016 03:12 IST