Join us  

Diwali 2018: या पाच ठिकाणी करू नका क्रेडिट कार्डचा वापर, होणार जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 4:19 PM

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांमध्ये नव्या वस्तू खरेदी करण्याचा उत्साह असतो.

नवी दिल्ली- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांमध्ये नव्या वस्तू खरेदी करण्याचा उत्साह असतो. त्यामुळे बाजारातही ग्राहकांची सामान खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. सद्यस्थितीत छोट्या छोट्या वस्तूंपासून मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा सर्रास वापर केला जातो. सणाच्या निमित्तानं बाजारात उपलब्ध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंटही दिला जातो.ब-याचदा ऑनलाइन शॉपिंग कंपन्या वस्तूंवर मोठी सवलत देत असून, क्रेडिट कार्डानं पेमेंट करण्याचा सल्ला देत असतात. त्या क्रेडिट कार्डावर तुम्हाला आणखी 10 टक्के किंवा त्याहून जास्त डिस्काऊंट मिळेल, असं सांगितलं जातं. परंतु ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या अशा आमिषांना बळी पडू नका. क्रेडिट कार्ड ग्राहकांना कॅशबॅक, रिवॉर्ड्स आणि झिरो लायबिलिटीसारख्या ऑफर्स देतात, त्या ऑफर्स म्हणजे ग्राहकांची फसवणूक असते. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुमच्यावर कर्जाचा बोजाही वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डापासून सावध राहिलं पाहिजे. दिवाळीच्या दिवशी चुकूनही या पाच ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करू नका.मोठ्या वस्तू खरेदी करण्यापासून वाचा- क्रेडिट कार्डद्वारे कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यावर बँका किंवा ऑनलाइन शॉपिंग कंपन्या चांगली सवलत देते. परंतु या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी दिलेल्या या भूलथापांनी भुरळून जाऊ नका. जेणेकरून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू नयेत. त्यामुळेच क्रेडिट कार्डचा वापर करणं टाळा.सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग- कधीही लक्षात ठेवा ज्या वेबसाइटच्या यूआरएल लिंकमध्ये नुसतं http असल्यास ती वेबसाइट सुरक्षित नसते. त्यामुळे httpsलिंकवाल्या वेबसाइटवरून शॉपिंग करावी, तसेच त्या कंपनीचा रेकॉर्ड चांगला आहे की नाही हे पडताळून पाहावे. थोडीशी सतर्कता दाखवल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.घरातील बिलं भरताना- महिन्याच्या शेवटी जेव्हा पैशांची चणचण असते, तेव्हा वीज, पाणी, मोबाइल आणि केबल बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डाच्या बिलाचा भरणा केला नाही, तर प्रतिदिन त्या रकमेवरचं व्याज वाढत जाते. कार खरेदी करताना- खरं तर कार खरेदी करताना डीलर्स क्रेडिट कार्डाचा स्वीकार करत नाहीत. तर काही जण थोड्याफार प्रमाणात क्रेडिट कार्डांनी पेमेंट करताता. कार्ड पेमेंट न स्वीकारण्यामागेही एक कारण आहे. कार्ड कंपनी या रकमेवर डीलर्सची कंपनी अथवा डीलर्सकडून एक ते तीन टक्क्यांपर्यंत शुल्क वसूल करते. त्यामुळेच गाडी खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करू नका. तर प्रतिष्ठित बँकेतूनही कारसाठी कर्ज घ्या.रिटेल खर्च- तुम्ही छोट्या छोट्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करता. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींवरचा खर्च कालांतरानं आपल्या नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे भविष्यात क्रेडिट कार्डाचं बिल मोठ्या प्रमाणात वाढतं. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकदिवाळी