Join us

२९ जुलै रोजी बँकांचा संप!

By admin | Updated: July 14, 2016 03:34 IST

सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँक कर्मचारी २९ जुलै रोजी संपावर जाणार आहेत.

चेन्नई : सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँक कर्मचारी २९ जुलै रोजी संपावर जाणार आहेत. आॅल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनने (एआयबीईए) ही माहिती दिली.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या झेंड्याखाली हा संप होणार आहे. या शिखर संघटनेत १0 लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी आहेत. सरकारी बँकांतील आपले समभाग विकून त्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला बँक संघटनांचा विरोध आहे. इतरही मागण्यांसाठी हा संप केला जात आहे. आॅल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी एका निवेदनात सांगितले की, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे खाजगीकरण, बँकांचे विलिनीकरण आणि पुनर्गठन या निर्णयांनाही संघटनांचा विरोध आहे. (वृत्तसंस्था)