Join us

काही समस्यांसाठी बँकाच जबाबदार

By admin | Updated: November 25, 2014 01:12 IST

बँकींग उद्योगासमोरील सध्याच्या काही समस्यांसाठी बँका स्वत:च जबाबदार असून याचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन सिटी बँकेचे भारतातील प्रमुख परमित झावेरी यांनी केले आहे.

मुंबई : आर्थिक घडामोडींना बळ मिळाल्याने बँकांना आपल्या काही समस्यांचा निपटारा करण्यास मदत होईल. मात्र, भारतीय बँकींग उद्योगासमोरील सध्याच्या काही समस्यांसाठी बँका स्वत:च जबाबदार असून याचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन सिटी बँकेचे भारतातील प्रमुख परमित झावेरी यांनी केले आहे.
ते म्हणाले, कठोर नियामकीय व्यवस्था ही नव्याने झालेली सामान्य बाब असून यासाठी तयार असलेल्या बँका इतरांना मागे टाकतील. भारतात बँकींग क्षेत्रत विशेषत: सरकारी बँका अनुत्पादक कर्ज संकटाचा सामना करत असतानाच झावेरी यांनी हे विधान केले असल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील बँका कायदेशीर व नियामकीय तक्रारींनाही सामोरे जात आहेत. झावेरी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. बँकींग उद्योगाचे भविष्य नेहमीच पायाभूत आर्थिक घडामोडींशी संबंधित असते. बँकींग उद्योगासाठी यात काही समस्या आर्थिक घडामोडींमध्ये मंदी आल्याने उद्भवल्या आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)