Join us  

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, BOB चा मेगा ई-लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 2:06 PM

Bank Of Baroda Mega E Auction : तुम्हालाही स्वस्तात घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करायचे असेल, तर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. 

नवी दिल्ली : स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आयुष्यभर कष्ट करत असतात. मात्र, प्रॉपर्टीच्या वाढत्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे कठीण होते. तुम्हालाही स्वस्तात घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करायचे असेल, तर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. 

बँक 24 मार्च 2022 रोजी मेगा ई-लिलाव आयोजित करणार आहे, ज्याद्वारे बँक प्रॉपर्टी कर्ज परत करण्यास असमर्थ असलेल्या ग्राहकांची घरे, दुकाने इत्यादी विकून त्यांचे पैसे वसूल करणार आहे.  बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून यासंबंधीची माहिती देताना म्हटले आहे की, "आता तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक करा. 24 मार्च 2022 रोजी बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावात सहभागी होऊन आपली ड्रीम प्रॉपर्टी खरेदी करा."

'या' प्रॉपर्टीचा होणार ई-लिलाव - घर- फ्लॅट्स- इंडस्ट्रियल प्रॉपर्टी- ऑफिस स्पेस

ई-लिलावात सहभागी होण्याची प्रक्रियातुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या या प्रॉपर्टीच्या लिलावात आधीच भाग घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला eBkray पोर्टलवर क्लिक करावे लागेल. दरम्यान, या पोर्टलद्वारे बँक सर्व गहाण प्रॉपर्टींचा लिलाव करते. या पोर्टलची खास गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही नोंदणीशिवाय या पोर्टलवर प्रवेश करून लिलाव करायच्या प्रॉपर्टीची यादी मिळवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या बँक, राज्य आणि जिल्ह्याच्या माहितीचा पर्याय निवडा. यानंतर, ई-ऑक्शनमध्ये बोली लावून आपली प्रॉपर्टी खरेदी करु शकता.

सरफेसी कायद्यांतर्गत लिलावप्रॉपर्टी सरफेसी कायद्यांतर्गत लिलाव करण्यात येत असल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. दरम्यान, प्रॉपर्टीवर कर्ज घेतल्यानंतर, जे त्याची वेळेवर परतफेड करत नाहीत, त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव बँक करते आणि त्यांच्या कर्जाची रक्कम वसूल करते. याआधी बँक ग्राहकाला याची माहिती देते. ग्राहकाने कर्जाची रक्कम भरल्यास प्रॉपर्टीचा लिलाव होत नाही. जर ग्राहकाने कर्जाची रक्कम परत केली नाही तर प्रॉपर्टीचा ई-लिलावद्वारे लिलाव केला जातो.

बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-लिलावात मालमत्ता खरेदीचे फायदे...- याद्वारे तुम्हाला क्लिअर टायटलची सुविधा मिळेल.- खरेदीदाराला प्रॉपर्टीचा तात्काळ ताबा दिला जाईल.- बँक खरेदीदाराला कर्जाची सुविधा देखील सहज देऊ शकते.

टॅग्स :बँकव्यवसाय