Join us  

२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:28 AM

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना विषाणूची महामारी सुरू झाल्यामुळे लागलेला लाॅकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसला असेल हा तुमचा समज वस्तुस्थिती समजताच धक्का देणारा आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) वर्ष २०२० साठीच्या अहवालात म्हटले आहे की, २०१९ मध्ये बँकांच्या फसवणुकीचे ९१ प्रकार घडले होते ते पुढच्या वर्षी १९६ झाले. वर्ष २०२० मध्ये सीबीआयकडे फसवणुकीची ५४३ प्रकरणे आली त्यातील १९६ ही बँकांच्या फसवणुकीची होती. २०२० मध्ये बँक फसवणुकीची रक्कम होती ६७ हजार ३१९.४० कोटी रुपयांची, तर २०१९ मध्ये ही रक्कम होती १९ हजार ८३०.१४कोटी रुपये.

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. पुणे, नागपूर आणि चेन्नईत १७, गुजरातच्या गांधीनगरमध्ये १६ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी फसवणुकीत लक्षवेधी होते येस बँक, डीएचएफएल, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स, टीडीपीचे नेते रायापाती सांबशिव राव यांच्याशी संबंधित ट्रान्सट्रोयचे ७ हजार ९२६.०१ कोटी रुपये.

वाढता वाढता वाढे...nसीबीआयने बँक फसवणुकीचे जे २७ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून घेतले त्यांची एकूण रक्कम होती ५३ हजार ३७९.३८ कोटी रुपये (७९.२९ टक्के) होती. nहा प्रत्येक एफआयआर हा ५०० कोटी रुपयांच्या वरील फसवणुकीचा होता. ४७ गुन्ह्यांतील रक्कम ही १०० ते ५०० कोटी रुपयांची होती व ती एकूण रक्कम ९ हजार ४२३.७८कोटी रुपये(१३.९९ टक्के) होती. n२०१७ मध्ये जे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडले त्यात बँक फसवणुकीचे प्रमाण होते फक्त ३ टक्के. २०२० मध्ये ही टक्केवारी ३६ वर गेली.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक