नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान ५० दिवस जादा काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम द्यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाशी संलग्नित नॅशनल आॅर्गनायजेशन आॅफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) या संघटनेने केली आहे.नोटाबंदीच्या काळात खूप मेहनतीने काम केल्याबद्दल अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी बँक कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली होती. अशात या संघटनेने थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून जादा कामासाठी ओव्हरटाईम देण्याची मागणी केली आहे. गेल्या ५० दिवसांत बँक कर्मचाऱ्यांनी दररोज १२ ते १८ तास काम केले. काही मोजक्या बँकाच जादा कामासाठी ओव्हरटाईम देतात. अन्य बँकांच्या व्यवस्थापनालाही अशा कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम देण्याचे निर्देश द्यावेत, तसेच बँकेत कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याची मागणी या संघटनेने केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांना नोटाबंदीचा हवाय ओव्हर टाईम
By admin | Updated: January 3, 2017 03:04 IST