Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात बंदीमुळे गडगडले डाळींबाचे भाव उत्पादकांना फटका : ४५ रूपये किलोचा थोक भाव

By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST

बुलडाणा : डाळींबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळींबाचे भाव घसरले आहेत. एरव्ही १०० ते १२० रूपये प्रति किलो भावाने विकले जाणारे डांळीब आता थोक बाजारपेठेत २० ते ६० रूपये प्रति किलोपर्यंत घसरले असल्याने डांळींब उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे.

बुलडाणा : डाळींबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळींबाचे भाव घसरले आहेत. एरव्ही १०० ते १२० रूपये प्रति किलो भावाने विकले जाणारे डांळीब आता थोक बाजारपेठेत २० ते ६० रूपये प्रति किलोपर्यंत घसरले असल्याने डांळींब उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे.
गत काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा फलोत्पादनाकडे कल वाढला असून, विदर्भात फळांच्या लागवडीत डाळींबाला सर्वाधिक पंसती आहे. जुलै महिन्याच्या प्रांरभीपासून बाजारात डाळींबाची आवक वाढली असून, भावही चांगला होता. निर्यातक्षम डाळींब साधारणपणे १२० ते १२५ रूपये प्रति किलो दराने बाजारपेठेत विकला जात होता; मात्र १५ ऑगस्टपासून डाळींबावर निर्यात बंदी आल्याने बाजारपेठेत डाळींबाची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी चांगल्या प्रतीच्या डाळींबाचे भाव ८० ते ६० रूपयांपर्यंत घसरले होते. आता हे भाव ४५ रूपयांपर्यंत उतरले आहेत. निर्यात बंदी नसती तर डाळींबाला चांगला भाव मिळाला असता, असे डाळींब उत्पादकांचे मत आहे.
कोट...
विदर्भात आता डाळींबाची शेती मोठया प्रमाणात होत असून, एकट्या बुलडाणा जिल्‘ात जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. निर्यात बंदीमुळे डाळींबाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. सध्या थोक बाजारपेठेत ४५ ते ५० रूपये प्रती किलो या भावाने चांगल्या प्रतीचे डाळींब विकले जात आहे.
- टि.डी.अंभोरे
जिल्हाध्यक्ष, डाळींब उत्पादक संघ, बुलडाणा
कोट...
डाळींब लागवडीत मिळणारा नफा लक्षात घेऊन उत्पादन घेतले; मात्र गत पंधरा दिवसात डाळींबाचे भाव उतरले. गत हंगामात २०० रूपये किलोपर्यंत भाव होता. आता मात्र ४५ रूपये किलोने विकावा लागत आहे.
- ज्ञानेश्वर गायकवाड,
डाळींब उत्पादक शेतकरी, गिरडा, ता.बुलडाणा
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़