Join us  

‘बॅलन्स ट्रान्सफर’ जोरात; ‘पेटीएम’चा पाय खोलात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 6:03 AM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्बंधांमुळे अडचणी वाढल्या

नवी दिल्ली : नियमभंगाचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करून निर्बंध लावले. २९ फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांच्या नोंदणीवर निर्बंध घातले. त्यामुळे या बँकेची सेवा घेणाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त पेटीएमच्या ग्राहकांनी खात्यातील पैसे अन्य बँकांमध्ये ट्रान्स्फर करणे सुरू केले आहे. 

ग्राहकांना अडचण येऊ नये यासाठी पेटीएमचे प्रतिनिधी स्वत: व्यापाऱ्यांना संपर्क करीत आहेत. ग्राहक इतर पर्याय शोधू लागल्याने गुगल पे आणि फोन पेसारख्या कंपन्यांना फायदा होत आहे. कोणतेही शुल्क न भरता पेटीएम बँकेतील अकाऊंट इतरत्र पोर्ट करण्याची सुविधा दिली जात आहे. यामुळे गुगल पे युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (वृत्तसंस्था)

इतर पेमेंट ॲप वापरा; व्यापाऱ्यांना सल्लाn२९ फेब्रुवारीपासून आरबीआयचे निर्बंध लागू होणार असल्याने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संघटनेनेही सदस्यांना पुढील अडचणी टाळण्यासाठी इतर पेमेंट ॲपचा वापर करण्यास सांगितले आहे. nकॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरबीआयच्या निर्बंधांमुळे पेटीएमच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.nयोग्य प्रकारे पडताळणी न करता पेटीएमने हजारो खाती उघडली आहेत. एकाच पॅन नंबरवर एक हजारहून अधिक यूजर्स लिंक झाल्याचे आढळले आहे. यातील काही खात्यांचा वापर मनी लाँडरिंगसाठी करण्यात आला असावा, असाही संशय व्यक्त होत आहे.

४ कोटींहून अधिक व्यापारी गमावणारपेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, खाती अन्यत्र ट्रान्स्फर करण्यासाठी कंपनी मदत करीत आहे. जवळपास ४ कोटींहून अधिक व्यापाऱ्यांनी आपली खाती अन्यत्र वळती करावी लागणार आहेत.  अनेकजण मित्र वा नातेवाइकांकडे ही रक्कम ट्रान्स्फर करीत आहेत.

टॅग्स :पे-टीएमव्यवसाय