Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या बाजारात बजाजचीच बाजी

By admin | Updated: January 8, 2016 03:04 IST

दुचाकी वाहनांच्या बाजारात, विशेषत: एन्ट्री लेव्हल आणि स्पोर्टस् मोटरसायकल श्रेणीत बजाज आॅटोने विक्रमी कामगिरी करत बाजारातील हिस्सेदारीत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

मुंबई : दुचाकी वाहनांच्या बाजारात, विशेषत: एन्ट्री लेव्हल आणि स्पोर्टस् मोटरसायकल श्रेणीत बजाज आॅटोने विक्रमी कामगिरी करत बाजारातील हिस्सेदारीत पहिला क्रमांक पटकाविला आहे. मंदीमुळे व कच्च्या मालात झालेल्या वाढीमुळे एकिकडे वाहन उद्योगांत मोठ्या प्रमाणावर आव्हाने निर्माण झालेली असली तरी बजाजने मात्र या सर्व आव्हानांचा सामना करत, द्वितीय व तृतीय श्रेणी बाजारपेठांत मोठी आगेकूच केली आहे. बाईकच्या बाजारात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीच्या बाजारपेठीय हिश्श्यात २३ टक्क्यांवरून ३६ टक्के अशी वाढ झाली आहे. तर एक लाख रुपये व त्याखालील किंमतीच्या बाईकच्या बाजारात कंपनीने ५३ टक्के हिस्सेदारी प्राप्त केली असल्याची माहिती कंपनीच्या मोटरसायकल व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष एरिक वास यांनी दिली. दरम्यान, कंपनीच्या लोकप्रिय अशा अ‍ॅव्हेन्जरच्या नव्या मॉडलेच्या अलीकडेच झालेल्या अनावरणानंतर डिसेंबर महिन्यांत २० हजार वाहनांची विक्री करण्यात यश आले आहे. तर, मार्च २०१६ पर्यंत अ‍ॅव्हेंजरच्या निर्मितीचा प्रति माह आकडा ३० हजार करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत. (प्रतिनिधी)