Join us

बजाज पल्सरची दोन मॉडेल्स बाजारात

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

वाहननिर्मित अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय पल्सरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. स्पोर्टस् श्रेणीतील ही दोन

मुंबई : वाहननिर्मित अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय पल्सरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. स्पोर्टस् श्रेणीतील ही दोन मॉडेल्स असून ए.एस.२०० आणि ए.एस.१५० अशी त्यांची नावे आहेत. तरुणाईत असलेली साहसी खेळाची आवड लक्षात घेऊन या दोन मॉडेल्सची निर्मिती करण्यात आली आहेत. तरुणाईची आवड आणि स्टाईल स्टेटमेंट या दोन घटकांना लक्षात घेत त्यांच्या डिझाईनकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टस श्रेणीतील या दोन बाईक्स असल्याने या बाईक्सची निर्मिती करताना ब्रेक आणि सस्पेन्शन यासह सुरक्षेच्या अनुषंगाने विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरावर विशेष लक्ष दिले आहे. गाडीचे लूक्स आणि रंग याकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. यापैकी ए.एस.२०० या गाडीची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत ९२,५०० रुपये आहे तर ए.एस.१५० या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ७९,००० रुपये आहे. (प्रतिनिधी)