Join us  

Axis Bank ची LGBTQ कर्मचारी, ग्राहकांसाठी मोठी घोषणा; 20 सप्टेंबरपासून होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 3:09 PM

Axis Bank Policies for LGBTQIA+: सप्टेंबर 2018 मध्ये आपल्या ऐतिहासिक आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दोन व्यक्ती जर कोणत्याही प्रायव्हेट ठिकाणी परस्पर सहमतीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्याला गुन्हा म्हणता येणार नाही, असे म्हटले होते.  

अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या LGBTQIA+ (समलैंगिक) कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना खास सुविधा सुरु करण्याची घोषणा केली आहे. यानुसार या समुदायाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य, ग्राहकांनी आपल्या पार्टनरला नॉमिनी बनविण्याची सूट आदींचा समावेश आहे. (Axis Bank announces policies for LGBTQIA+ employees, customers)

अ‍ॅक्सिस बँकेने सोमवारी आपले LGBTQIA+ साठी धोरण जाहीर केले. यासाठी एक चार्ट बनविण्यात आला आहे. सप्टेंबर 2018 मध्ये आपल्या ऐतिहासिक आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दोन व्यक्ती जर कोणत्याही प्रायव्हेट ठिकाणी परस्पर सहमतीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्याला गुन्हा म्हणता येणार नाही. 

बँकेच्या या नव्या पॉलिसीनुसार एलजीबीटी समुदायाचे सर्व कर्मचारी आपल्या पार्टनरचे नाव मेडिक्लेम फायद्यांसाठी देऊ शकतात. हा पार्टनर जेंडर, सेक्स किंवा वैवाहिक स्थितीतील नसला तरी देखील त्याचे नाव देता येते. याचा फायदा लग्न केल्याशिवाय किंवा करता न येत असलेल्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. एवढेच नाही तर LGBT कर्मचाऱ्याला कोणत्या रेस्टरुममध्ये बसायचे असेल तर तो त्याच्या जेंडर आयडेंटिटी किंवा एक्सप्रेशन नुसार निवड करू शकतो. कंपनीने आपल्या मोठ्या कार्यालयांमध्ये सर्व जेंडरसाठी रेस्टरुम बनविले आहेत. तसेच हे कर्मचारी त्यांच्या आवडीनुसार कपडे परिधान करू शकतात. 

अ‍ॅक्सिस बँकेने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या भावनेला अनुसरून बँकेने हे #ComeAsYouAre  पाऊल उचलले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. 20 सप्टेंबरनंतर या समुदायाचे ग्राहक त्यांच्या सेम जेंडर पार्टनरसोबत सेव्हिंग अकाऊंट, एफडी खाते सुरु करु शकतात. तसेच त्यांना नॉमिनी देखील बनवू शकतात. फक्त त्यांच्या नावासमोर मिस्टर (Mr) किंवा मिसेज (Mrs) च्या ऐवजी 'Mx' लावण्याचा पर्याय दिला जाणार आहे. 

टॅग्स :बँकएलजीबीटी