Join us

आॅगस्टमध्ये वाहन उद्योगाचा टॉप गीअर

By admin | Updated: September 2, 2015 00:09 IST

देशात दोन, तीन आणि चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत आॅगस्ट महिन्यात काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळता चांगली वाढ झाली

नवी दिल्ली : देशात दोन, तीन आणि चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत आॅगस्ट महिन्यात काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळता चांगली वाढ झाली. वाहन कंपन्यांनी ही माहिती मंगळवारी निवेदनाद्वारे दिली. उत्तम बाजारपेठ कौशल्ये आणि ग्राहक केंद्रित धोरणांमुळे हे यश मिळाले.देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीची एकूण विक्री आॅगस्ट २०१५ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून १,१७,८६४ कार्सची झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १,१०,७७६ होती.देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री ८.६ टक्के वाढून १,०६,७८१ कार्सची विक्री झाली.

अशोक लेलँडहिंदुजा समूहाच्या अशोक लेलँडच्या विक्रीत ३८.५३ टक्के वाढ होऊन कंपनीने ११,५४४ वाहने विकली. गेल्या वर्षी ८,३३३ वाहने विकली गेली होती.

महिंद्रा अँड महिंद्रामहिंद्रा अँड महिंद्राच्या व्यवसायात १.२९ टक्क्यांची वाढ होऊन ३५,६३४ वाहने विकली गेली. २०१४ मध्ये कंपनीने ३५,१८० वाहने विकली होती. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या विक्रीमध्ये २२.०३ टक्क्यांची घट होऊन ११,६९९ वाहने विकली गेली. ही विक्री गेल्या वर्षी १५,००६ एवढी होती.

ह्युंदाई मोटारह्युंदाई मोटारच्या व्यवसायात १३.५० टक्क्यांची वाढ होऊन ५४,६०८ वाहने विकली गेली. गेल्यावर्षी कंपनीने आॅगस्टमध्ये ४८,१११ कार विकल्या होत्या. कंपनीची निर्यात १.७९ टक्क्यांनी खाली येऊन १४,१०३ कार्स विकल्या गेल्या.

व्हीई कमर्शियलव्यावसायिक वापराची वाहन उत्पादक कंपनी व्हीई कमर्शियलच्या विक्रीमध्ये २०.२१ टक्क्यांची वाढ होऊन ३,७११ वाहने विकली.

टोयोटा किर्लोस्करटोयोटा किर्लोस्कर मोटारच्या विक्रीत १.२९ टक्के वाढ होऊन ती १२,५४७ झाली.यामाहा मोटारयामाहा मोटार इंडियाच्या विक्रीमध्ये १५ टक्क्यांची वाढ होऊन ६१,४४० वाहने विकली गेली.