Join us

वाहन विम्याचा दावेही आता आॅनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:58 IST

ग्राहकांना वाहन विम्याचा दावा आॅनलाइन करता यावा, यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीने ‘इन्स्टास्पेक्ट’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे.

मुंबई : ग्राहकांना वाहन विम्याचा दावा आॅनलाइन करता यावा, यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीने ‘इन्स्टास्पेक्ट’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. यावर ग्राहकांना व्हिडीओ कॉलद्वारे वाहनाला झालेले नुकसान कंपनीच्या प्रतिनिधीला दाखविता येणार आहे. ही प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पार पडणार असून, याद्वारे लगेचच ग्राहकांना त्यांचा दावा कंपनीकडून मान्य करून घेता येणार आहे. सध्या ५० हजारांपर्यंतच्या दाव्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री यांनी दिली. ग्राहकांना विम्याचा दावा करणे सोपे आणि जलद व्हावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचेही मंत्री गुरुवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.