Join us  

मस्तच! Bank Holiday च्या दिवशीही मिळणार पगार, १ ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 9:06 AM

Rules Change From 1st August: येत्या १ ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधिक काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेनेही आपले काही नियम बदलले आहेत

मुंबई - येत्या १ ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधिक काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI Bank) आपले काही नियम बदलले आहेत. (Rules Change From 1st August ) याशिवाय १ ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्येही बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. जाणून घेऊया १ ऑगस्टपासून नेमक्या कुठल्या नियमांमध्ये बदल होणार आहे ते. (From August 1, there will be a change in these rules of daily life, which will have a direct effect on the common man)

१ ऑगस्टपासून बँक हॉलिडेच्या दिवशीही मिळणार पगार १ ऑगस्ट २०२१पासून रविवार किंवा अन्य कुठलाही बँक हॉलिडे असला तरी तुमचा पगार, पेंन्शन, डिव्हिडंट आणि इंट्रेस्टचे पेमेंट अडकणार नाही. म्हणजेच निश्चित तारखेला पगार आणि पेंन्शनचा भरणा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे संचालित NACH च्या माध्यमातून बल्क पेमेंट जसे की, पगार, पेन्शन, व्याज, डिव्हिडेंट इत्यादींचा व्यवहार होणार आहे. १ ऑगस्टपासून NACHची सुविधा ७ दिवस २४ तास मिळणार असल्याने पगारही कधीही ट्रान्सफर होऊ शकणार आहे.

एटीएमच्या शुल्कात वाढभारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फीज वाढवली आहे. याआधी १५ रुपये असलेली इंटरचेंज फीज आता १७ रुपये करण्यात आली आहे. तर नॉन बिगर वित्तीय व्यवहारांसाठी आकारण्यात येणारी फी ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येईल. एखादा ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून ५ वेळा निशुल्क व्यवहार करू शकतो. यामध्ये आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएमचाही निशुल्क वापर करू शकतात.

आयसीआयसीआय बँकेमधील हे नियम बदलणार देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेमध्येही १ ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहे. आयसीआयसीआय बँकेमधून १ ऑगस्टपासून कॅश काढणे महागणार आहे. तसेच चेकबूकच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. आयसीआयसीआय बँकेकडून ग्राहकांना चार ट्रान्झॅक्शनची सेवा मोफत दिली जाते. तसेच चार वेळा पैसे काढल्यानंतर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. रेग्युलग सेव्हिंग अकाउंटवर आयसीआयसीआय बँक दर महिन्याला चार कॅश ट्रान्झॅक्शन फ्री देते. फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १५० रुपये द्यावे लागतील.

आयसीआयसीआय बँकेचे बदललेले अन्य काही नियम -ऑगस्टपासून आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक आपल्या होम ब्रँचमधून एक लाख रुपये काढू शकतात- यापेक्षा अधिक व्यवहार झाल्यास ५ रुपये प्रति एक हजार रुपये द्यावे लागतील- होम ब्रँच शिवाय अन्य कुठल्याही ब्रँचमधून पैसे काढल्यास दररोज २५ हजार रुपयांपर्यंत कॅश काढण्यावर शुल्क आकारले जाणार नाही.- त्यानंतर एक हजार रुपये काढण्यासाठी ५ रुपये द्यावे लागतील

चेकबुकवर लागणार एवढा चार्ज २५ पानांचे चेकबूक फ्री असेल, त्यानंतर तु्म्हाला २० रुपये प्रति १० पानांच्या अतिरिक्त चेकबुकसाठी द्यावे लागतील.

सिलेंडरच्या नवे दर होणार जारी १ ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या किमती जारी होत असतात.  

टॅग्स :व्यवसायबँकिंग क्षेत्रआयसीआयसीआय बँकगॅस सिलेंडरभारतीय रिझर्व्ह बँक