नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी, एस्सार पॉवर, जीएमआर आणि टाटा पॉवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १६०० कोटींच्या सबसिडी लिलावात भाग घेणार आहेत. या माध्यमातून या कंपन्या आपल्या वीज प्रकल्पांसाठी गॅस खरेदी करू शकतात. १५ आणि १६ मार्चला हा लिलाव होणार आहे. यातून प्रतिदिन एक कोटी घनमीटर गॅस खरेदी होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील एमएसटीसी या ई लिलावाचे आयोजन करणार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता हा लिलाव सुरू होईल. दोन दिवस दररोज दोन ते तीन तास हा लिलाव चालेल. हा लिलाव एक दिवसच होणार होता; पण त्यानंतर हा लिलाव दोन टप्प्यात होणार आहे.
गॅस प्रकल्पांसाठी आजपासून लिलाव
By admin | Updated: March 15, 2016 02:20 IST