Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासबागमध्ये जास्त मैदाने होण्यासाठी प्रयत्नशील : पाटील - मोतीबाग तालीम वसतिगृह भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST

कोल्हापूर : खासबाग कुस्ती मैदानात दरवर्षी किमान पाच ते सहा मैदाने होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाला मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपये निधी मिळाला त्यातून मोतीबाग तालीम येथे वसतिगृहाच्या विस्तारीकरण भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते.

कोल्हापूर : खासबाग कुस्ती मैदानात दरवर्षी किमान पाच ते सहा मैदाने होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाला मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपये निधी मिळाला त्यातून मोतीबाग तालीम येथे वसतिगृहाच्या विस्तारीकरण भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते.
पाटील म्हणाले, खासबाग कुस्ती मैदानात दरवर्षी पाच ते सहा कुस्ती मैदाने होतील यासाठी साखर कारखाने, उद्योगपती यांच्या सहकार्याने नियोजन केले जाईल. तसेच तालीम संघाने कुस्तीसाठी आणखी काही योजना आखल्या तर जास्तीत जास्त निधी आणण्याची ग्वाही दिली.
सतेज पाटील म्हणाले, गावागावांत कुस्ती कला वाढली पाहिजे व शाहू छत्रपतींची कुस्ती परंपरा जिवंत राहण्यासाठी शासन प्राधान्याने कार्यरत आहे.
यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत तालीम संघाचे सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे यांनी स्वागत केले, तर डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, हैदराबादचे माजी आमदार रुपसिंह, महान भारत केसरी दादू चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, नामदेव मोळे, अशोक नागराळे, अशोक माने, नामदेव पाटील, विश्वास हारुगले, अमृत भोसले, संभाजी पाटील, संभाजीराव आसगावकर, संभाजी वरुटे, विश्वासराव सासने, बाजीराव चव्हाण, मारुतराव कातवरे, ॲड. माणिक मुळीक, ॲड. शिवाजीराव राणे, अजित मोहिते, वसंतराव तडवळे, विलासराव सासने, हिंदकेसरी विनोद चौगले, यशवंत मुडळे, बाळासाहेब शेट्ये, किसण कल्याणकर, निवासराव साळुंखे, नगरसेवक आदिल फरास, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, बाबूराव चव्हाण, विजयसिंह पाटील, माणिक मंडलिक, मुकुंद करजगार, आदी उपस्थित होते.
----
चौकट
मोतीबाग तालीम येथे १५०हून अधिक मल्ल शिकण्यासाठी राहत आहेत. या मल्लांना राहण्यासाठी सध्याची जागा अपुरी आहे. यामुळे आखाड्यावरील जागेत १५० मुलांना राहण्यासाठी आर.सी.सी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
--------------------------------------
फोटो : १२कोल-मोतीबाग०२
फोटो ओळी : मोतीबाग तालीम येथे शनिवारी वसतिगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, तालीम संघाचे अध्यक्ष माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, हैदराबादचे माजी आमदार रुपसिंह, महान भारत केसरी दादू चौगले, आदी उपस्थित होते.
(छाया : राज मकानदार)