Join us

मनसेच्या शाखाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

कल्याण - भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. यात त्यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याण - भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. यात त्यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
भोईर हे चिकणघर विभागाचे शाखाध्यक्ष असून त्यांच्या कार्यालयात काम करणारा मयूर केणे आणि विजय तेली या दोघांचे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले़ याची माहिती मिळताच भोईर यांनी दोघांनाही कार्यालयात बोलवून त्यांची समजूत घातली. या रागातून तेलीने आपल्या साथीदारांच्या मदतीने भोईर यांच्यासह स्वप्नील वर्पे आणि रतन केणे या तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय तेली, सचिन यादवडे, जय डोंगरे, निखिल देसले यांच्यासह अन्य १० ते १२ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका कारची मोडतोडही करण्यात आली
आहे.
------------
मनसेचा कल्याण बंदचा इशारा
हल्ला प्रकरणातील आरोपींना २४ तासांत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी माजी आमदार प्रकाश भोईर, शहराध्यक्ष रवींद्र भोसले, सरचिटणीस इरफान शेख यांनी एमएफसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश कटके यांना निवेदन दिले़ दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या घटनेची माहिती घेतली असून सोमवारी ते कल्याणमध्ये येऊन जखमींची भेट घेणार असल्याची माहिती शेख यांनी दिली.