Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तरुणीवर शिर्डीत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:13 IST

तिच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यात येत होती.

अमरावती : येथील एका तरुणीवर शिर्डीतील हॉटेलमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० मार्च २०१० ते २०११-१२ या कालावधीत हा प्रकार घडल्याची तक्रार पीडितेने १९ एप्रिल रोजी फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली.फ्रेजरपुरा हद्दीत राहणाऱ्या या पीडितेची आरोपी नरेंद्र विठ्ठलराव गुहे (५५) याच्याशी ओळख होती. तिच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यात येत होती. दरम्यान, २० मार्च २०१० आरोपीने स्थळ दाखविण्याची बतावणी करीत तिला शिर्डीला नेले आणि तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देत तेथील एका हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केली. त्यानंतरही सन २०११ व २०१२ मध्ये त्याच हॉटेलमध्ये नेऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केला. तसेच अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिचे ठरलेले लग्न मोडले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत़ पोलीस तपासात तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यात येईल़ त्यानंतर आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल़ आरोपीने आरोप फेटाळल्यास त्याच्याविरोधात खटला चालेल़

टॅग्स :बलात्कारलैंगिक छळ