Join us

आजच आटपा बँकांचे व्यवहार!

By admin | Updated: March 26, 2015 23:41 IST

बँकेचे काही महत्त्वाचे व्यवहार जर तुम्हाला करायचे असतील तर ते आज (२७ मार्च) पूर्ण करा अन्यथा, आगामी आठवड्यात असलेल्या सुट्यांमुळे बँकांचे व्यवहार पूर्णपणे थंडावणार आहेत.

मुंबई : बँकेचे काही महत्त्वाचे व्यवहार जर तुम्हाला करायचे असतील तर ते आज (२७ मार्च) पूर्ण करा अन्यथा, आगामी आठवड्यात असलेल्या सुट्यांमुळे बँकांचे व्यवहार पूर्णपणे थंडावणार आहेत. २८ मार्च रोजी रामनवमी असल्यामुळे बँकांना सुटी आहे. त्यानंतर २९ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवारी ३० मार्चला पूर्ण दिवस नियमित कामकाज होईल. मात्र, त्यानंतर ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सरकारी बँका ग्राहकांसाठी बंद असतील. परंतु, केवळ ज्यांना कर भरणा करायचा आहे, अशाचग्राहकांसाठी काही विशेष काऊंटर्स सुरू असतील. खाजगी बँका मात्र ३१ मार्च रोजी ग्राहकांसाठी खुल्या राहतील. ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाची सुटी ही १ एप्रिल रोजी असल्याने बँका पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर २ एप्रिल रोजी महावीर जयंती आणि ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे अशा सलग दोन सुट्या आहेत. तर ४ एप्रिलला पुन्हा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असेल. तर ५ एप्रिल रोजी रविवार असल्याने पुन्हा बँका बंद राहतील. परिणामी, ६ एप्रिलपासून बँकांचे व्यवहार पूर्ववत होतील.आता बँकांचे संगणकीकरण झाले असले आणि कोअर बँकिंग झाले असले तरी, शहरांतर्गत धनादेश वटण्यासाठी किमान २४ तास तर शहराबाहेरचा अथवा अन्य राज्यातील धनादेश वटण्यास ४८ तासांचा अवधी लागतो. परंतु, मोठमोठ्या ब्रेक्सनंतर बँका एखाद दोन दिवस आणि त्यातही अर्धा दिवस खुल्या राहणार असल्याने धनादेशाद्वारे होणारे व्यवहार मोठ्या प्रमाणावर रखडतील.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नेट बँकिंगद्वारे आॅनलाईन ट्रान्स्फरचे जे व्यवहार होतील, त्यालादेखील खीळ बसणार आहे. कारण, अन्य बँकांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेलाही सुटीचे कॅलेंडर लागू असल्याने, एनईएफटी आणि आरटीजीएसतर्फे जे व्यवहार होतात, त्याचे रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती सर्व्हरमधून क्लिअरिंग होणार नाही. (प्रतिनिधी)४बँकांच्या सुुट्यांच्या काळात ४८ तासांच्या आत एटीएममध्ये खडखडाट दिसून येतो. त्यामुळे शनिवारी २८ मार्च रोजी एटीएममध्ये पैशांचा भरणा झाल्यानंतर थेट ३० मार्च आणि ३१ मार्च रोजी पैशांचा भरणा होईल. त्यानंतर, मात्र थेट ४ एप्रिल रोजी एटीएममध्ये पैसे भरले जातील. परिणामी १ एप्रिल ते ४ एप्रिल कालावधीमध्ये अनेक एटीएममध्ये खडखडाट होईल.४एकीकडे अर्थव्यवस्था वेग पकडत असताना आणि दिवसाकाठी व्यवहारांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे अशा पद्धतीने आठ दिवस बँका बंद राहणे, याचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो. त्यामुळे बँकांना जरी सुटी असली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवहारांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने केली आहे.