दमाणी प्रशालेत विज्ञान प्रदर्शन
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
सोलापूर:
दमाणी प्रशालेत विज्ञान प्रदर्शन
सोलापूर: बी. एफ. दमाणी प्रशालेत आंतरवर्गीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. यावेळी शशिकांत मोरे, उदयकुमार पाटील, संस्थेचे स्थानिक अध्यक्ष वेणुगोपाल तापडिया, सचिव नंदकिशोर भराडिया, सहसचिव पांडुरंग मंत्री, मुख्याध्यापिका सोनटक्के, पर्यवेक्षिका मळेकर, शेळके, मारडकर, विकास मरगूर, राऊत, हुडगे, आवाशंक उपस्थित होते.सोमनाग प्रशालेत आरोग्यावर मार्गदर्शनसोलापूर: सुनीलनगरच्या सोमनाग प्रशालेत किशोरवयीन मुलींना आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालक सभाही पार पडली. यावेळी अध्यक्ष चौगुले, डॉ. वाघमारे, डॉ. जोशी, गायकवाड, कल्पवृक्ष व कदम उपस्थित होते.क्रिसेंट नवजीवन शाळेत स्वच्छता अभियानसोलापूर: यशोदानगर होटगी रोड येथील क्रिसेंट नवजीवन इंग्लिश शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कचरा, टाकाऊ वस्तू काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता व डेंग्यू जागृतीवर पत्रक वाटण्यात आले. यामध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्र्यांनी सहभाग घेतला.एमआयएमच्या शिबिरात 185 जणांचे रक्तदानसोलापूर: एआयएमआयएमतर्फे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या शिबिरात 185 जणांनी रक्तदान केले. यावेळी प्रभारी तौफिक शेख, शकील शेख, शुकूर मनाजी, अमिन तरेकरी, वसीम शेख, पैगंबर शेख, नाहिद शेख, इरफान शेख, मलिक शेख, जाकीर इनामदार, जुबेर शेख उपस्थित होते.बार्शीत मंगळवारी द्राक्षवर चर्चासत्रसोलापूर: आत्मा व कृषी विभागातर्फे मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी येथे द्राक्षवर चर्चासत्र होणार आहे. यावेळी डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. एस. के. उपाध्याय, डॉ. डी. एस. यादव मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक डी. एस. गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नायकवाडी यांनी केले आहे.सोमवारी ‘आज या देशामध्ये’सोलापूर: हिराचंद नेमचंद वाचनालयातर्फे सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. ‘आज या देशामध्ये’ या कविता व गीतांचा कार्यक्रम होणार आहे. विं. दा. करंदीकर, कुसुमाग्रज, बा. सी. मर्ढेकर, अरूण कोल्हटकर यांचे गीत व कविता सादर होणार आहेत. मराठी भावानुवाद निरंजन उजगरे, संकलन दिग्दर्शक चंद्रकांत काळे, संगीत आनंद मोडक, निर्माती संध्या काळे, विभावरी देशपांडे, चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी हे कलावंत करणार आहेत.पत्रे वाटून टिपू सुलतान यांना अभिवादनसोलापूर: एस. पी. सोशल वेल्फेअर असोसिएशनने टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक न काढता यातील खर्चाला फाटा देऊन गरिबांना पत्रे वाटप केले. यावेळी नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण, अहमद शेख, अफसर पटेल, सोहेल पठाण, सद्दाम पठाण उपस्थित होते. यावेळी प्रभा व्हटकर यांच्या घराला पत्रे देण्यात आले. चौडेश्वरी विद्यालयात स्वच्छता अभियानसोलापूर: जोडभावी पेठेतील चौडेश्वरी प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डॉ. इंदापुरे, डॉ. मंजुर्शी कुलकर्णी, पाळंदे, मुख्याध्यापक गुर्रम उपस्थित होते. हेमोग्लोबिन तपासणीबरोबर विद्यार्थ्यांना आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ केला. शास्त्री प्रशालेतही स्वच्छता अभियानसोलापूर: लाल बहादूर शास्त्री प्रशालेत स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक हाडोळे, एस. पी. वाघमारे, एम. के. गिराम, भांदुर्गे, ए. एस. तावसकर उपस्थित होते. संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी यावर मार्गदर्शन करण्यात आले.मार्कंडेयचे स्नेहसंमेलन साजरेसोलापूर: साखरपेठेतील मार्कंडेय हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन पार पडले. उद्घाटन कमानपुरे यांनी केले. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका संगीता देगावकर होत्या. विद्यार्थ्यांनी गाणी, सोलोडान्स, नाटिका सादरी केली. सूत्रसंचालन रानसर्जे यांनी केले. इराबत्ती यांनी आभार मानले. पंच्याहत्तरीतील ज्येष्ठांचा 23 ला सत्कारसोलापूर: भावसार क्षत्रिय समाज ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे पंच्याहत्तरीतील ज्येष्ठांचा सत्कार रविवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता करण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, एस. जी. पुकाळे उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष बाबुराव हंचाटे यांनी सांगितले.