Join us

जागतिक व्यापाराला आशियाचा आधार

By admin | Updated: November 24, 2015 23:41 IST

आशियाच्या जोरावर २०५० पर्यंत जागतिक बाजार ६८.५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता एचएसबीसीच्या एका अहवालात वर्तविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आशियाच्या जोरावर २०५० पर्यंत जागतिक बाजार ६८.५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता एचएसबीसीच्या एका अहवालात वर्तविण्यात आली आहे. या काळात भारतातील वस्तूंंच्या निर्यातीचा वृद्धीदर चीनपेक्षा अधिक होईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एचएसबीसीच्या ‘लँडमार्क ट्रेड विंड्स’च्या अहवालात या बाबी वर्तविण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, २०५० पर्यंत चारपट वाढून ६८,५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्यात आशियाची भूमिका प्रमुख असेल. २०१५ ते २०५० या काळात भारतातून होणारी वस्तूंची निर्यात अंदाजे ६ टक्के राहील. याच काळात चीनमधून होणारी वस्तूंची निर्यात ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील, असे हा अहवाल म्हणतो. सध्या २०५० पर्यंत एशिया -पॅसिफिकची व्यापार भागीदारी सध्या असलेल्या व्यापारापेक्षा ३३ टक्क्यांनी वाढून ४६ टक्के होईल, त्याचवेळी पश्चिम युरोपातील हिस्सेदारी ३४ टक्क्यांनी घटून २२ टक्के होईल.