Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीयन्सना आशियाई कंपन्यांची पसंती, दिल्या सर्वाधिक नोक-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 03:22 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) प्लेसमेंटमध्ये यंदा अमेरिकेच्या तुलनेत आशियाई कंपन्यांकडून जास्त नोकरी प्रस्ताव आले आहेत

मुंबई/नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) प्लेसमेंटमध्ये यंदा अमेरिकेच्या तुलनेत आशियाई कंपन्यांकडून जास्त नोकरी प्रस्ताव आले आहेत. जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर येथील कंपन्यांनी यंदा नोकºयांचे सर्वाधिक प्रस्ताव दिले आहेत.वास्तविक, मायक्रोसॉफ्टने यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक नोकरी प्रस्ताव दिले आहेत. ओरॅकलने मात्र यंदा अमेरिकेसाठी एकही प्रस्ताव दिलेला नाही. यंदा आंतरराष्टÑीय प्रस्तावांतही वाढ झाली आहे. १ डिसेंबरला सुरू झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधील प्राथमिक आकडेवारीनुसार, आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूर येथे यंदा विदेशातील प्रस्तावांची संख्या तिपटीपेक्षा जास्त झाली आहे.आयआयटी मद्रासमध्ये गेल्या वर्षी पहिल्या तीन दिवसांत ६ आंतरराष्टÑीय नोकरी प्रस्ताव आले होते. ते यंदा २२ झाले आहेत. आयआयटी खरगपूरमध्ये गेल्या वर्षी ९ प्रस्ताव होते, ते यंदा ३0 झाले आहेत. आयआयटी रूरकीमध्ये गेल्या वर्षी पहिल्या तीन दिवसांत ७ आंतरराष्टÑीय प्रस्ताव आले होते, ते यंदा १३ झाले आहेत. आयआयटी कानपूरमध्ये २0 विदेशी प्रस्ताव आले. गेल्या वर्षीपेक्षा ते ५0 टक्के अधिक आहेत. आयआयटी मुंबईमधील विदेशी प्रस्तावांची संख्या ५0 वरून ६0 झाली आहे.सूत्रांनी सांगितले की, यंदा विदेशी प्रस्तावातील वाढीमागे आशियाई कंपन्यांनी दिलेल्या जास्तीच्या प्रस्तावांचे कारण आहे. आयआयटी रूरकीमध्ये मायक्रोसॉफ्टने रेडमंड येथील कार्यालयासाठी तीन नोकरी प्रस्ताव दिले आहेत. याउलट जपानची अ‍ॅप आॅपरेटर कंपनी मेरकारीने नऊ प्रस्ताव दिले आहेत. नवागत कंपनी वेबस्टाफचा एक प्रस्ताव धरून जपानमधून आलेल्या प्रस्तावांची संख्या १0 होते.आयआयटी रूरकीचे प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एन. पी. पाधी यांनी सांगितले की, आयआयटी विद्यार्थ्यांकडे आता विदेशी कंपन्या अधिकाधिक आकर्षित होत आहेत. जपान त्यात आघाडीवर आहे. जपानमधील लोकसंख्या अधिकाधिक ज्येष्ठ होत असल्यामुळे तेथील कंपन्यांना तरुण तंत्रज्ञांची गरज आहे.आशियातील कंपन्या आक्रमकआयआयटी कानपूरला अमेरिकी कंपन्यांकडून आठ नोकरी प्रस्ताव मिळाले आहेत. आशियाई कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावांची संख्या१० आहे. आयआयटी मुंबईला जपानमधून ११ विदेशी प्रस्ताव आले आहेत. आयआयटी मद्रासला जपानमधून ९ प्रस्ताव मिळाले आहेत, असे प्रशिक्षण व प्लेसमेंट सल्लागार मनू संथानम यांनी सांगितले. खरगपूर येथील करिअर विकास केंद्राचे संचालक देवाशिश देव यांनी सांगितले की, यंदा आशियाई कंपन्या प्लेसमेंटच्या बाबतीत आक्रमक आहेत.