Join us  

अश्नीर ग्रोव्हरचा कमबॅक; लवकरच लॉन्च करणार ZeroPe App, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 2:26 PM

BharatPe App: BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी एमडी अश्नीर ग्रोव्हर ZeroPe अॅपद्वारे फिनटेक क्षेत्रात पुनरागमन करत आहेत.

What is ZeroPe : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी एमडी अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पुन्हा एकदा फिनटेक क्षेत्रात परतणार आहेत. त्यांनी ZeroPe नावाचे नवीन ॲप सुरू केले आहे. या अॅपद्वारे युजर्सना वैद्यकीय कर्जाची सुविधा देईल. सध्या या ॲपची चाचणी सुरू आहे. लवकरच हे अॅप सर्व युजर्ससाठी सुरू होईल. गुगल प्ले स्टोअरच्या लिस्टिंगनुसार, थर्ड युनिकॉर्न कंपनीने ZeroPe तयार केले आहे. भारतपे सोडल्यानंतर अश्नीर ग्रोव्हर यांनी ही कंपनी सुरू केली.

ZeroPe म्हणजे काय, कसे काम करेल?ZeroPe ने दिल्लीस्थित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) Mukut Finvest सोबत भागीदारी केली आहे. याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे त्वरित प्री-अप्रूव्हड मेडिकल लोन  दिले जाईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या ॲपशी संबंधित सेवा फक्त भागीदारी असलेल्या रुग्णालयांमध्येच मिळू शकतात. दरम्यान, अश्नीर ग्रोव्हरच्या ZeroPay व्यतिरिक्त, अनेक ॲप्स अशाप्रकारच्या सुविधा देतात. यामध्ये Fibe, SaveIn, Neodocs, Kenko Qube Health, Arogya Finance आणि Mykare Health चा समावेश आहे.

विशेष म्हणजे, अनेक डिजिटल फर्स्ट स्टार्टअपदेखील रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी कर्ज देतात. यामध्ये हॉस्पिटल ॲडमिशन, होम केअर आणि क्रॉनिक केअर मॅनेजमेंटचा समावेश होतो. तसेच, ॲपवर हॉस्पिटल नेटवर्क, आरोग्य विमा आणि सरकारी योजनांची माहिती दिली जाते. सिंगापूर स्थित बी कॅपिटल कंपनीच्या रिपोर्टनुसार, भारतातील डिजिटल आरोग्य सेवा बाजार 2030 पर्यंत $37 अब्जपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

थर्ड युनिकॉर्न काय आहे?अशनीर ग्रोव्हरने जानेवारी 2023 मध्ये पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि चंदीगड येथील व्यावसायिक असीम घावरी यांच्यासोबत मिळून थर्ड युनिकॉर्न कंपनी सुरू केली. कंपनीने फॅंटसि गेमिंग ॲप Cricpay ने सुरुवात केली, जी Dream11, Mobile Premier League (MPL) आणि Games24x7 च्या My11Circle सारखीच काम करते.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकबँकिंग क्षेत्र