Join us
Daily Top 2Weekly Top 5

एरिस मिडीयाच्या वतीने महागृह महोत्सव लकी ड्रॉ सोहळा संपन्न

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST

वाणिज्यचा लोेगो वापरणे

वाणिज्यचा लोेगो वापरणे

ठाणे : एरिस मिडीया आयोजित महागृह महोत्सवाचा लकी ड्रॉ सोहळा नुकताच होरायझन सभागृह, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे पार पडला.
एरिस मिडीया कडून २८ मार्च २८ एप्रिल या दरम्यान आयोजित महागृह महोत्सवात सहभागी झालेल्या पनवेलकर ग्रुप, शाश्वत ग्रुप व श्री महालक्ष्मी ग्रुप या तिन्ही डेव्लहपर्सकडे या एका महिन्यामध्ये ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद देऊन १७५ घरांचे बुकींग केले. लकी ड्रॉ समारंभासाठी सहभागी बिल्डर्स आणि त्यांचे ग्राहक, व इतर आमंत्रित उपस्थित होते. या महोत्सवात ज्या ग्राहकांनी घरे घेतली होती, त्यांना एरिस मिडीयाकडून लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे देण्यात आली. यामध्ये बंपर बक्षिस हुंडाई इऑन कार, पहिले बक्षीस १.५ लाखाचे सोने, दुसरे बक्षीस १ लाखाचे सोने, तिसरे बक्षीस ७५ हजारांचे सोने त्यानंतर १४ बाईक आणि चार मॉड्युलर कीचन ही बक्षीसे देण्यात आली. ग्राहकांना स्वस्तात मस्त घरे मिळावीत व त्यांची इतर स्वप्ने पूर्ण व्हावीत हे महागृह महोत्सवाचे मुख्य उद्दीष्ट होते असे काशिनाथ पवार यांनी सांगितले.

*ही जाहीरात विभागाची बातमी आहे
फोटो आहे...