Join us
Daily Top 2Weekly Top 5

पनाश फिनिशिंग स्कूलचे नागपुरात आगमन

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

फोटो पनाश फिनिशिंग स्कूल नावाने रॅपमध्ये.....

फोटो पनाश फिनिशिंग स्कूल नावाने रॅपमध्ये.....
फोटो ओळ - पनाश फिनिशिंग स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी दीप प्रज्वलन करताना अमृता फडणवीस, बाजूला कविता गोलछा व इतर.

देशभरात ख्याती : अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : हैदराबाद येथील देशभरात ख्याती असलेल्या पनाश फिनिशिंग स्कूलचे नागपुरात आगमन झाले आहे. शाळेच्या नागपूर केंद्राचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले.
शाळेच्या प्रवर्तक कविता गोलछा यांनी सांगितले की, जीवनात प्रगती करण्याची, व्यक्तिमत्त्व विकास करण्याची आणि व्यावसायिक व वैयक्तिक लक्ष्य गाठण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पनाश फिनिशिंग स्कूल एक संधी आहे. प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिक व वैयक्तिक प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी शाळेतर्फे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत विविध व्यवसाय व वयोगटातील ३५०० जणांनी विविध उपक्रम, कार्यशाळा व अभ्यासक्रमांचा लाभ घेतला आहे. पनाश फिनिशिंग स्कूलतर्फे नागपूरनंतर रायपूर, इंदूर, कानपूर, लखनौ, गोवा, अंबाला व चेन्नई येथे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पनाश स्कूलने उद्योग, आदरातिथ्य, आरोग्य, रिटेल, ऑटोमोबाईल डिलर, रिअल्टर्स व डेव्हलपर्स, बँकिंग व फायनान्शिया, शिक्षण संस्था, उत्पादक, निर्यातदार, व्यापारी आदींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत.
नागपूर केंद्राच्या निधी पोद्दार व पूजा अग्रवाल म्हणाल्या, प्रशिक्षण कार्यक्रमात वागणूक, संवाद कौशल्य, सांस्कृतिक व्याख्याने, कार्यशाळा, नेतृत्वगुण विकास, व्यावसायिक व सामाजिक शिष्टाचार, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी बाबींचा समावेश आहे. नृत्य दिग्दर्शक शामक डावर, योगगुरू भारत ठाकूर, त्वचातज्ज्ञ डॉ. मालविका कोहली, शिक्षणतज्ज्ञ निरू कपाई, सामाजिक कार्यकर्ते विलास काळे, ब्रँड मॅनेजर संजय अरोरा, सौंदर्यविषयक सल्लागार सशा काळे, एक्स्पर्ट बेकर टॉबी भगवागर, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी डॉ. नीना साहू, फॅशन स्टायलिस्ट श्रुती संचेती, डायनिंग एक्स्पर्ट पायल सराफ यांचा मार्गदर्शकांमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी पनाश फिनिशिंग स्कूल, हल्दीरामच्या बाजूला, शंकरनगर चौक येथे संपर्क साधावा.