Join us

आपण गरीब का ?

By admin | Updated: February 1, 2016 02:20 IST

आर्थिक नियोजन आज प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी आवश्यक ठरले आहे. वाढणारी महागाई, कर्जाच्या हप्त्यांची मारु तीच्या शेपटीसारखी वाढणारी संख्या

आर्थिक नियोजन आज प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी आवश्यक ठरले आहे. वाढणारी महागाई, कर्जाच्या हप्त्यांची मारु तीच्या शेपटीसारखी वाढणारी संख्या, वाढणारे करदायित्व, कमी होत जाणारे व्याजदर आणि सरकारी निष्क्रियता हे सर्व घटक प्रत्येक सजग व्यक्तिला आयुष्याचा गांभिर्याने विचार करायला लावतात. मिळणारे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा मेळ घालताना मेटाकुटीला आलेली व्यक्ति व्यवहारीकतेपेक्षा भाविनक निर्णयाप्रती झुकत जाते. काहीवेळा समजून तर काहीवेळा नकळतपणे घेतलेले निर्णय घराची अर्थव्यवस्था अडचणीत आणते. मानवी जीवन अशाश्वंत असल्याने आणि ‘‘ पैसा ‘‘ हा घटक भल्या बुऱ्या परिणामांचा कारक ठरल्याने आर्थिक नियोजनाला पर्याय नाही. आर्थिक नियोजनाआधी बचतीची व्याख्या समजून घेतली तर....!बचत, जमा-खर्च, गुंतवणूक, आर्थिक नियोजन हे सर्व समजून घेण्याआधी मी कसा आहे ?माझा स्वभाव कितपत खर्चिक आहे? भाविनक खर्च करताना खोट्या प्रतिष्ठेला किती बळी जातो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना होणारे ‘आत्मज्ञान’ आयुष्य संरक्षित करतेच, पण एक वेगळी आनंदयांत्रा सुरू होते. हेच आत्मज्ञान प्रगल्भ आर्थिक सुस्थापित जीवन जगण्याचे समाधान प्राप्त करून देते.आज श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. प्रत्येकाला श्रीमंती फक्त पैशानेच मिळते या समजाने घेरले आहे. श्रीमंत होण्यासाठी पैशाव्यतिरिक्त बरेच काही लागते. त्यासाठी एकीकडे आर्थिक क्षेत्राचे ज्ञान मिळवताना दुसरीकडे स्वत:ला-कुटुंबाला आर्थिक शिस्त लावावी लागते. प्रत्येक खर्चाचे विश्लेषण करावे लागते. कदाचित हे विश्लेषण खर्च करण्याआधी केले तर अधिक परिणामकारी ठरते. बचतीचा निग्रह आण िनियंत्रित खर्च श्रीमंतीची कवाडे उघडी करीत असतात.खरे म्हणजे श्रीमंत कसे व्हायचे यापेक्षा आपण आता गरीब का आहोत? या प्रश्नाचे विश्लेषण प्रत्येक व्यक्तीने करणे आज काळाची गरज बनली आहे. महागाईसाठी सरकारकडे अंगुलीनिर्देश करताना तीन बोटे आपल्याकडेही वळलेली आहेत याची जाणीव ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. क्र ेडिटकार्ड/डेबिट कार्डचा अनावश्यक वापर, भावनेच्या भरातील खरेदी, मित्र सहकारी, सहयोगी यांचा प्रभाव [उदा. आपण कुठे राहावे, काय खावे, कोणती खरेदी करावी, याचे सर्व निर्णय मित्र-सहकारी ठरवतात किंवा आपण त्यांच्या कृतींनुसार कृती करतो.], महागडे मोबाइल्स आणि त्यांच्या टॅरिफची अनावश्यक खरेदी, सिगरेट, गुटखा-तंबाखू, दारू तसेच अनावश्यक पर्यटनाच्या [विक एंड सहली, शिर्डीला किंवा अन्य धार्मिक यात्रांच्या स्थळी अनेक दिवस चालत जाणे] आहारी जाणे. चित्रपट मॉलमधेच बघणे, बोलींग सारख्या खेळांच्या नादी लागणे, आपल्याकडे नसलेल्या गोष्टी-वस्तु दाखवण्याची वृत्ती, स्वत:चे करीयर, बचत, सेवानिवृत्ती आणि इतर खर्चांचे कसलेही नियोजन नसणे. तसेच डोक्यावर अन्य कर्जाचा भर असताना अजून एक कर्ज घ्यायला हरकत नाही अशी बेफिकीर प्रवृत्ती. स्वस्त वस्तू वाईट दर्जाच्या असल्याने अधिक काळ टिकत नाहीत हे माहीत असूनही अशा वस्तूंवर पैसे खर्च करून तत्कालिक बचतीचा भले आनंद मिळेल पण दीर्घ अवधीत चांगल्या वस्तूच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम खर्च झाल्याचे दिसेल. या सर्व पाशर््वभूमीवर श्रीमंत होण्यासाठी आपण गरीब का याचा शोध घेतलाच पाहिजे.(लेखक हे वित्तीय सल्लागार आहेत.)