Join us

५५१ कोटींच्या एफडीआयला मंजुरी

By admin | Updated: July 4, 2014 05:56 IST

परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळ अर्थात एरआयपीबीने थेट परदेशी गुंतवणूकीच्या ५५१ कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना मंजूरी दिली

नवी दिल्ली : परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळ अर्थात एरआयपीबीने थेट परदेशी गुंतवणूकीच्या ५५१ कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना मंजूरी दिली. यात मॉरीशसच्या डेस्टीमनी इंटरप्रायजेसच्या ४८९.९९ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे इक्विटी शेअर अंशत: खरेदी करण्याचा प्रस्तावाचाही समावेश आहे.अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अमरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला आपली मूळ कंपनी अल्बनी मॉलिक्यूलर रिसर्चमध्ये ५९.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मंजूरी मिळाली आहे. अजॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन तथा मोन्सॅटो होल्डिंग्जसह एफडीआयच्या ३१ प्रस्तावांवर शुक्रवारी विचार होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)